हृदयद्रावक ! कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 10 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; आई गंभीर (संग्रहित फोटो : अपघात)
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा पुलावर दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात शनिवारी (दि.18) रात्री सव्वादहाच्या सुमारास झाला. उमेश राहंगडाले (वय 29, रा. गोवारी टोला, जिल्हा गोंदिया) असे यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हेदेखील वाचा : Nashik Accident News: नाशिकमध्ये घोटी-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृ्त्यू
उमेश दुचाकीने लाखनीकडून भंडाऱ्याकडे जात होता. दरम्यान, त्याची दुचाकी एका स्कूटीला मागून धडकली. दुचाकीसह रस्त्यावर पडून उमेश यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. तर दुसरीकडे दुचाकीने जात असलेल्या तरूणाला चारचाकी वाहनाने धडक देऊन जखमी केल्याची घटना खरबी येथे घडली. फिर्यादी आदिनाथ मनोहर पाटील (30, रा. चिखली) हे दुचाकीने जात असताना खरबी येथील राष्ट्रीय महामार्गावरील चिखला फाटा येथे एका कारने (एमएच-36/एएल-2261) जोरदार धडक दिली.
याप्रकरणी कारचालक सुरेश भाऊराव राऊत (35, रा. परसोडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आदिनाथ पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. जवाहरनगर पोलिसांनी चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नरेंद्राचार्य संस्थानचे रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे घटनास्थळावर दाखल झाले. गडेगाव महामार्ग पोलिस आशिष ठोंबरे, दिनेश रामटेके यांच्या मदतीने अपघातग्रस्ताला रुग्णवाहिकेतून भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नाशिकच्या एसएमबीटी हॉस्पिटलजवळ अपघात
तिसऱ्या घटनेत, घोटी-सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ एक अपघात घडला. कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा चक्काचूर झाला. तर अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी जखमींना मदत करत तातडीने रुग्णालयात पोहोचवले. हा अपघात नेमका कशामुळे घडला, हे तपासाअंती स्पष्ट होईल.
हेदेखील वाचा : Akshay Shinde Encounter Case: हायकोर्टाच्या अहवालावर अक्षयची आई भावूक; म्हणाली, “आम्ही अजूनही भीक…”