फोटो -टीम नवराष्ट्र
खंडाळा : सध्या राज्यभर गणेशोत्सवाची धुमधाम आहे. सर्वत्र गणरायाचे जल्लोषामध्ये स्वागत केले जात आहे. तसेच गणेशोत्सवामुळे चाकरमानी गावाकडे परतू लागले आहेत. घाट रस्त्यावर बंद पडलेली वाहने अणि महामार्गावर वाहनांची वाढती वर्दळ,यामुळे खंबाटकी घाटात मध्यरात्रीपासून वाहतूक कोंडी झाली.दरम्यान,पारगाव-खंडाळ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
अधिक माहितीनुसार, शनिवार,रविवारी असणाऱ्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई,पुण्याला असलेले चाकरमानी उत्सवासाठी गावाकडे परतू लागले आहेत.त्यामुळे अशियाई महामार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असल्याचे दिसून येते.शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन अवजड वाहने बंद पडल्याचे सांगण्यात आले.बंद पडलेली वाहने अणि वाहनांची वाढती संख्या यामुळे खंबाटकी घाट पुन्हा जाम झाला.
वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक पर्यटक,प्रवासी चाकरमानी सुमारे अठरा तास खोळंबल्याची माहीती मिळत आहे.तर काही वेळ बोगदा मार्गे वाहतूक सुरू करण्यात आली होती.सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्ववत काही अंशी वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करण्यात आली.
यावेळी खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, सहाय्यक पोलीस फौजदार राजू अहिरराव,संजय पोळ,प्रकाश फरांदे, संजय जाधव,अमित चव्हाण,श्रीकांत भोसले,महामार्ग पोलीस ए.पी.आय वर्षा शिंदे,पी.एस.आय शाम गोरड,प्रकाश घनवट,सहाय्यक फौजदार अविनाश डेरे,किशोर नलवडे, मिथून मोरे,विजय बागल,रविद्र वाघमारे, प्रमोद फरांदे,हेमंत ननावरे,मनोज गायकवाड,संतोष कचरे यांनी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले.मात्र महामार्गावर वाहनांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते होते.






