भाजपची १० उमेदवारांची यादी जाहीर (फोटो -ट्विटर)
मुंबई: काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कालपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी बैठकांवर बैठका घेत आहेत. दरम्यान आज महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. जागावाटपावर चर्चा होणार आहे. दरम्यान भाजपकडून २५ जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे. आजच्या बैठकीत १२० जागांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
भाजपने २५ जागांवर उमेदवार निश्चित केल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार सध्याच्या विद्यमान सरकारमधील काही मंत्र्यांना डावलण्यात आल्याचे समजते आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते आहे. भाजपने निश्चित केलेल्या २५ जणांच्या यादीत फडणवीस आणि पाटील यांचे नाव असल्याचे समजते आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा पुण्यातील कोथरूड मंतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी बाकी राहीला आहे. भाजपने पहिल्या यादीतून काही विद्यमान मंत्र्यांना वगळल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आपापल्या मतदारसंघात प्रचार आणि सभा घेऊन मतदारांना आवाहन करण्यासाठी उमेदवारांकडे फारच कमी कालावधी राहणार आहे.
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मनसे देखील स्वतंत्रपणे लढणार आहे. तर राज्यात तिसरी आघाडी देखील उदयास आली आहे. त्यामुळे राज्यात कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. दरम्यान भाजपकडून कोणत्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, ते पाहुयात.
भाजकपडून पहिल्या १० उमेदवारांची घोषणा?
नंदुरबार – विजयकुमार गावीत
कोथरूड- चंद्रकांत पाटील
नागपूर पश्चिम- देवेंद्र फडणवीस
धुळे ग्रामीण – सुभाष भामरे
धुळे शहर – अनुप अग्रवाल
रावेर – हरिभाऊ जावळे
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव – सुरेश भोळे
शहादा – राजेश पाडवी
सिंदखेडा – जायकुमार रावल