जेजुरीत भाजपाचे स्वबळावर लढण्याचे संकेत
Jejuri local body Eection: महाराष्ट्राचे कुलदैवत तथा बहुजन बांधवाचा लोकदेव तथा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगा लागली आहे. निवडणुकीची घोषणा होताच सक राजकीय पक्षांनी आपल्या हालचालींना वेग दिल असून या निवडणुकीत तुतारी घड्याळ धनुष्यबाणा आघाडी विरुद्ध भाजपाची एकला चलो रे भूमिका अशी थरारक लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
निवडणूक आयोगाने दहा प्रभागांतील २० नगरसेवका व एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. शहरातील एकूण मतदारसंख्या १५ ८०० असून त्यात ७, ५८३ पुरुष, ८, २१५ महिला आणि २ इतर मतदारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १० ते १७ नोव्हेंबर छाननी १८ नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची अंतिमा तारीख २५ नोव्हेंबर, मतदान २ डिसेंबर तय मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी शरद पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षांमध्ये आघाडीची चर्चा सुरू असून निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शनिवारी (दि. ८) पुण्यातील बैठकीत घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या आधाडीतून दिलीप बारभाई, जयदीप बारभाई, गणेश निकुडे, रोहिदास कुंभार हे प्रमुख नेते समन्वयाची भूमिका निभावत आहेत.
आमदार विजय शिवतारे यांची भूमिकाही या समीकरणात निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष आणि देवसंस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी थेट मैदानात उतरून निडणुकीत वेगळीच रंगत आणली आहे.
पुणे जिल्हा माहिती अधिकार कायदा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते हरिदास रत्नपारखी यांनी परिपत्रकाच्या माध्यमातूम प्रचाराला सुरवात करीत नगराध्यक्ष पदासाठी मतदान करण्याचे बेट मतदारांना आवाहन करीत आहेत.
माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार टेकवडे आणि बाबा जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने उमेदवारांच्या बैठका सुरू केल्या आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपातून सुधीर गोडसे, अजिंक्य जगताप-देशमुख, सचिन सोनवणे आणि सचिन पेशवे ही नावे चर्चेत आहेत. पक्षाने स्वबळावर लढण्याच्चा निर्णय घेतला असून एकला चलो रेच्या भूमिकेत प्रचारयंत्रणा सज्ज झाली आहे.
आघाडीकडून नगराध्यक्षासाठी जयदीप बारभाई आणि गणेश निकुडे ही नावे आघाडीवर आहेत. या पदाचे आरक्षण यावेळी सर्वसाधारण असल्याने दोन्ही गटांतून अनेक दावेदार सक्रिय झाले आहेत.
मल्हारी मार्तड हाच माझा पक्ष, आणि जेजुरीकर बांधव हाच माझा पॅनल या घोषवाक्याने प्रचाराला प्रारंभ केला आहे. जगताप यांनी १४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले असून ते राष्ट्रवादी (अजितदादा गट) कडून उमेदवारीसाठीही चाचपणी करत आहेत.






