मुंबई : भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. याबाब त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या तपास प्रकरणात परमबीर डीसीपी त्रिमुखे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे घटनेतील कलम 311 (2) (ब) आणि (क) चा वापर करुन पंतप्रधान आयपीएस अधिकाऱ्याला काढून टाकू शकतात, असे भातखळकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आणि एफआयआर वैध ठरवला. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत या तपासात मुंबई पोलिसांनी कोणतीही प्रगती केली नसल्याचे देखील भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे.
प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आल्यामुळे परमबीर सिंह हे कोणाला तरी क्लीनचिट देण्यासाठी उत्सूक असल्याचे स्पष्ट होत असल्याचे देखील भातखळकर यांनी म्हटले. तसेच या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून 65 दिवस कोणताही एफआयआर दाखल करण्यात आला नाही. कोरोना चाचणीविनाच मृतदेहाचे ऑटोस्पाय करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून दबाव होता.
काही दिवसांपूर्वी भातखळकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्यात या प्रकरणात एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलिस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत. सीबीआयने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केल्याचे म्हटले होते.
[read_also content=”या असल्या बाईला आई म्हणायच? पोटच्या मुलाला विकून खरेदी केला टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन; पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाली… https://www.navarashtra.com/crime/the-mother-sold-her-child-and-bought-a-tv-freezer-cooler-nrvk-290262.html”]
[read_also content=”जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं; बर्म्युडा ट्रँगलमध्ये विमाने, जहाजे का गायब का होतात याचा खुलासा अखेर झाला https://www.navarashtra.com/viral/bermuda-triangle-mystery-solved-nrvk-278192.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]