मुंबई : जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) आशीर्वाद यात्रेला (Ashirwad Yatra) घाटकोपर पश्चिम अमृतनगरमधील (Ghatkopar West, Amrut Nagar) छत्रपती शिवाजी महाराज चौकातून (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) जोरदार सुरूवात झाली. भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, खा. मनोज कोटक यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतून आणलेला धनुष्यबाण उंचावत यात्रेची सुरुवात झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाजप – शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. एकूण सहा लोकसभा मतदार संघातून ही यात्रा निघणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली. यात्रेत जवळपास १० हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते बाईकवर स्वार होऊन भाजपा-शिवसेना झेंडा फडकवत सहभागी झाले. यात्रा मुलुंड बाळराजेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली.
[read_also content=”म्हणे, आपलं सरकार! मुंबईतल्या डबेवाल्यांना भेडसावतेय भलतीच चिंता, थेट मुख्यमंत्र्यांनाच पाठवलंय पत्र, केलीये काळजी व्यक्त; पण अद्यापही… https://www.navarashtra.com/maharashtra/note-the-falling-marathi-percentage-in-mumbai-dabbawalas-letter-to-the-chief-minister-of-maharashtra-nrvb-374165.html”]
यावेळी बोलताना भाजप मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, “भाजप आणि शिवसेना सोबत असून धनुष्यबाण चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व आमच्याबरोबर आहे याचा आनंद आहेच, तसा आनंद जनतेलाही आहे. जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठीच ही यात्रा आहे.” असेही ते म्हणाले. यावेळी आ. राम कदम, आ. मिहीर कोटेचा, आ. पराग शाह यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






