मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट व भाजपा मैदानात उतरले होते. पण शेवटच्या क्षणी भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, अर्ज मागे घेण्यासाठी राज ठाकरे तसेच शरद पवार यांनी भाजपाला आवाहन केलं होतं. त्यानंतर भाजपाने अर्ज मागे घेतला. मात्र यानंतर भाजपा व शिंदे गटावर टिका होत आहे. तसेच पराभव होत असल्यामुळं अर्ज मागे घेतला अशी टिका विरोधक करताहेत.
[read_also content=”अंधेरी पोटनिवडणूक मतदान व निकालादिवशी निर्देशित क्षेत्रात मद्यविक्रीला बंदी – जिल्हाधिकारी https://www.navarashtra.com/maharashtra/andheri-by-election-voting-and-result-day-ban-on-sale-of-liquor-337928.html”]
दरम्यान, आज उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) भाजप व शिंदे गटासह राज ठाकरेंवर सुद्धा टिका केली. अंधेरी पोटनिवडणुकीत पराभव दिसत असल्यानं भाजपाची माघार घेतली, अशी टिका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. शिवसेनेवर जेव्हा जेव्हा आघात झाला, तेव्हा तेव्हा शिवसेना दहापटीने वाढली आहे, हा शिवसेनेचा इतिहास आहे. ठाणे चिडीचूप नाही झालं तर, चिडीनं पेटून उठलं आहे. ठाण्यात कधीही सभा घ्या, मी आलोच म्हणून समजा. शिंदेंनी शिवसेनेचं नाव व चिन्ह गोठवलं आणि लढायला भाजपाला पुढे केलं आहे. अशी टिका एकनाथ शिंदेंवर यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. जे काय सध्या सुरु आहे, ते जनतेला पटत नाही. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप व शिंदे गटासह राज ठाकरेंवर सुद्धा टिका केली.