Chikhli Bank Delay in Farmer Loan Waiver
या गंभीर समस्येवर बोलताना शेतकरी नेते सरनाईक यांनी शासन आणि बँक प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ‘हेअरकट नुसार उर्वरित रक्कम भरण्याची मुख्य जबाबदारी बँकांची असताना आणि शास्रन-बँकांमध्ये करार झालेला असतानाही बैंका का टाळाटाळ करत आहेत, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने या मनमानी कारभारावर तत्काळ चाप लावला नाही, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची व खर्चाची भरपाई संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडूनच वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, सरपंच अरुण सरनाईक, उपसरपंच शिवशंकर ठेंग, श्रावण बडगे, गजानन टेंग, पंजाबराब आटोळे, समाधान पंडागळे, परमेश्वर साळवे, औचितराव चव्हाण, अनिल परीहार, राजेश आंभोरे, संजय पंडागळे आणि अजाबराव बडगे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या चिखली शाखेत शेलगाव जहागीर येथील शेतकऱ्यांचा , तर इंडियन ओव्हरसीज बैंक शाखा एकलारा) येथे चंदनपूर व भौरसा-भोरसी येथील शेतकऱ्याच्या कर्जमाफीची रक्कम शासनाकडून गत ऑगस्ट महिन्यातच जमा करण्यात आली आहे.
नियमांनुसार बँकांनी कर्जखाती बंद करण्यासाठी आवश्यक यादी वरिष्ठ अधिका-यांवकाडे पातवणे आणि हेअरकट नुसार बैंकानी भरावयाची व्याज व तफावतीची उर्वरित रक्कम जमा करणे अपेक्षित होते, मात्र, दीड ते दोन महिने लोटूनही बैंकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या तांत्रिक दिरंगाईमुळे शेतकऱ्याची कर्जखाती अजूनही कागदोपत्री सुरूच असून, खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर आता रब्बी हंगामासाठीही नवीन पीककर्ज मिळेनासे झाल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.






