Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक; मराठवाड्यासाठी कोणते निर्णय होणार?

सात वर्षाच्या कालावधीनंतर आज, शनिवारी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे विविध प्रस्ताव सादर करण्यात आले असून, ते सुमारे ५५ हजार कोटींच्या घरात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 16, 2023 | 08:20 AM
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक; मराठवाड्यासाठी कोणते निर्णय होणार?
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : सात वर्षाच्या कालावधीनंतर आज, शनिवारी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे विविध प्रस्ताव सादर करण्यात आले असून, ते सुमारे ५५ हजार कोटींच्या घरात असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राप्त प्रस्तावापैकी काही निवडक प्रस्तावांचा विचार बैठकीत होईल व विभागासाठी सुमारे ४० ते ४५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले जाईल, अशी शक्यता आहे.

यापूर्वी २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत मराठवाडाच्या विकासाला उभारी देण्यासाठी ४९ हजार २४८ कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. या बैठकीत देखील मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या.

मात्र, या घोषणा फक्त कागदावरच होत्या, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप विरोधक करीत आहेत. मराठवाड्यात आरोग्य, सिंचन, रस्ते यासह विविध क्षेत्रांतील अनुशेष अद्याप भरून काढणे बाकी आहे. त्यासाठी भरीव अशी तरतूद करण्यासाठी, ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ओरड केली जात आहे.

कोणत्या कामांचे प्रस्ताव मांडले जाणार?

मराठवाड्यातील दळणवळण, सिंचन तसेच कृषी, वैद्यकीय महाविद्यालय, रिंग रोड बनविण्यासह जलसंपदा खात्याने विभागात १,३११ कोटी खर्चातून सहा नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव या बैठकीसमोर मांडले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगिलतं आहे.

दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील बळीराजासाठीही विशेष पॅकेज जाहीर केले जाऊ शकते, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली. गेल्या आठ महिन्यांत मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलं आहे. पावसाने दडी मारल्याने बळीराजादेखील हैराण आहे. हीच बाब लक्षात घेता, राज्य सरकारकडून मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Cabinet meeting today in chhatrapati sambhajinagar what decisions will be made for marathwada nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2023 | 08:20 AM

Topics:  

  • BJP
  • Cabinet Meeting
  • Cm Eknath Shinde
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Marathwada
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
4

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.