Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad Election 2026: शिंदे गटाचे गोपीकिशन व विप्लव बाजोरियांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

गोपीकिशन बाजोरिया यांनी जिल्हाधिकारी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. "आम्हाला उच्च न्यायालयात जाण्यापासून रोखण्यासाठी निर्णयाची प्रत वेळेत देण्यात आली नाही. आमच्या अर्जाची सुनावणी केवळ १५ मिनिटांत आटोपली, तर विरोधकांची सुनावणी अनेक तास चालली.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 03, 2026 | 11:39 AM
Case Registered Against Shinde Faction Leaders Gopikishan and Viplav Bajoria

Case Registered Against Shinde Faction Leaders Gopikishan and Viplav Bajoria

Follow Us
Follow Us:

Amaravati  Vidhan Parishad Election 2026:  अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विधानपरिषद निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान विप्लव बाजोरिया यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या बाजोरिया पिता-पुत्रांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालण्यास सुरूवात केली, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पाळण्यात बसून ज्येष्ठाचा लोकल प्रवास! राखीव जागा असूनही आसन मिळेना; रेल्वेच्या गर्दीचे भीषण वास्तव चव्हाट्यावर

जिल्हाधिकाऱ्यांशी असभ्य वर्तनाचा आरोप

तक्रारीनुसार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू असताना विप्लव बाजोरिया यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशीच वाद घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा आणि धमकीवजा भाषेचा वापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

अर्ज बाद झाल्यानंतर ‘हायव्होल्टेज ड्रामा’

विप्लव बाजोरिया हे महायुतीचे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांच्या शपथपत्रावरील आक्षेपांमुळे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. निर्णयाची प्रत मिळाल्यानंतर त्यांनी हा निर्णय न्यायालयात आव्हान देणार असल्याचे जाहीर केले.

अर्ज बाद झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा गोंधळ उडाला असून, या घटनेने अमरावतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांवर पक्षपातीपणाचा आरोप

दरम्यान, गोपीकिशन बाजोरिया यांनी जिल्हाधिकारी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “आम्हाला उच्च न्यायालयात जाण्यापासून रोखण्यासाठी निर्णयाची प्रत वेळेत देण्यात आली नाही. आमच्या अर्जाची सुनावणी केवळ १५ मिनिटांत आटोपली, तर विरोधकांची सुनावणी अनेक तास चालली. जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षपाती भूमिका घेत आमचा अर्ज बाद केला,” असा आरोप त्यांनी केला.

MLC Election : विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांसमोर बंडखोरांचेच आव्हान; अंतर्गत वादामुळे वाढली धुसफूस

भाजपची डोकेदुखी कमी?

अमरावतीची जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला आली होती. अशावेळी विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने भाजपसमोर बंडखोरीचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, त्यांचा अर्ज बाद झाल्यामुळे महायुतीतील संभाव्य मतविभाजनाचा धोका कमी झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, बाजोरिया पिता-पुत्रांनी प्रशासनाच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढा देण्याचे संकेत दिले असून या प्रकरणातील पुढील घडामोडींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Case registered against shinde faction leaders gopikishan and viplav bajoria

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Amravati Politics
  • crime news
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
1

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
2

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
3

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.