मुंबई : माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मागील आठवड्यात ज्ञानाची, शिक्षणाची देवता माता सरस्वतीबद्दल (sarswati) आक्षेपार्ह विधान केले होते, यावर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच छगन भुजबळ यांच्या विरोधात निषेध आंदोलन सुद्धा करण्यात आलेय. तसेच छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरुन वातावरण तापले असताना, आणि राजकीय (politics field) वर्तुळात चर्चा रंगत असताना, आता यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
[read_also content=”प्रताप सरनाईक यांना प्रतिवादी करण्यास परवानगी द्या, याचिकाकर्त्यांची मागणी मान्य https://www.navarashtra.com/maharashtra/allow-pratap-sarnaik-to-appear-as-respondent-accept-petitioner-demand-bombay-high-court-332457.html”]
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील औवेसी असल्याची घणाघाती टिका केली आहे. तसेच छगन भुजबळ यांची थेट तुलना एमआयएमचे नेते व दोन भाऊ औवेसी यांच्याशी केली आहे. कारण औवेसी हे असेच वादग्रस्त हिंदू धर्माबद्दल वक्तव्य करत असतात, म्हणून आपणाला छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील औवेसी वाटतात, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.