औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात क्रांती चौकातून काँग्रेसचा निघालेला मोर्चा पोलिस प्रशासनाच्या वतीने थांबवण्यात आला होता, यावेळी काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांनी केंद्रावर मोठी टीका केली होती. मात्र, माजी आमदार कल्याण काळे यांनी केलेले आरोप चुकीचे असून, त्यांनी त्यांची भावना बोलून दाखवली आहे, याच्यात केंद्राचा काही संबंध येत नाही. तो निर्णय शहरातील पोलिस आयुक्त व पोलीस प्रशासनाचा होता. अशी माहिती शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट दिली.
[read_also content=”पूर्व उपनगरात २४ तास पाणीपुरवठा, मुंबई पालिका प्रशासनाच्या दाव्यावर नगरसेवकांचे प्रश्नचिन्ह https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/corporators-asking-questions-about-24-hours-water-supply-in-easter-suburbs-of-mumbai-nrsr-238396.html”]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र संदर्भात केलेले वक्तव्यावर संजय शिरसाट म्हणाले कि, महाराष्ट्र सरकारने कोरोना संसर्गाचे वेळी मोठ्या प्रमाणात कामे केली असून गोरगरिबांना आणि मध्यमवर्गीयांना शिवसेनेच्यावतीने खूप मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली आहे. या कामांचा सगळ्यांनी गौरव केलेला आहे. देशाच्या पंतप्रधानांनी अशी वक्तव्य करणे चुकीचे आहे. अशी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
[read_also content=”कुणाच्याच घराबाहेर आंदोलन करणं योग्य नाही- नवाब मलिक https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/nawab-malik-syas-it-is-not-right-to-agitate-outside-anyones-house-238412.html”]