Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छ. संभाजीनगरकरांची पाणी कोंडी फुटणार! मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; नव्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू होण्याची चिन्हे

छत्रपती संभाजीनगर शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती २४ तासांत पूर्ण झाली आहे. आज रविवारी दुपारनंतर शहरातील सिडको, हडकोसह इतर भागांना पाणी मिळण्याची शक्यता आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 14, 2026 | 02:46 PM
छ. संभाजीनगरकरांची पाणी कोंडी फुटणार! मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण (Photo Credit- X)

छ. संभाजीनगरकरांची पाणी कोंडी फुटणार! मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • छ. संभाजीनगरकरांची पाणी कोंडी फुटणार!
  • मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण
  • नव्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू होण्याची चिन्हे
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतून अखेर रविवारी शहरवासीयांना पाणी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जायकवाडी परिसरातील मुख्य जलवाहिनीवरील फुटलेल्या व्हॉल्व्हची दुरुस्ती शनिवारी सायंकाळी पूर्ण झाल्यानंतर जॅकवेलमधून पुन्हा पंपिंग सुरू करण्यात आले. रात्रभर जलवाहिनी भरण्याचे काम सुरू राहणार असून कोणताही तांत्रिक अडथळा न आल्यास रविवारी दुपारनंतर शहराला नव्या योजनेतून पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जीव्हीपीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहरासाठी उभारण्यात आलेल्या ३९२ एमएलडी क्षमतेच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतून पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये पाणी घेऊन योजनेची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर मुख्य जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्र आणि अन्य यंत्रणांच्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. प्रारंभी दोन दिवस २० एमएलडी पाणी शहराला पुरवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही तांत्रिक कामांसाठी कंत्राटदार कंपनीने शटडाऊन घेतल्याने प्रक्रिया थांबली होती. शटडाऊनदरम्यान जायकवाडी धरणातील पाणीपातळी घटल्यामुळे सायफन पद्धतीने पाणी उपसा करण्यास अडथळे निर्माण झाले. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने पर्यायी उपाययोजना राबविली.

तीन सबमर्सिबल पंपांच्या साहाय्याने पाणी उचलून ते सायफन पाइपजवळ सोडण्यात आले. त्यानंतर व्हॅक्यूम पंपाद्वारे हवेचा दाब निर्माण करून सायफन प्रणाली पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे जॅकवेलमध्ये पाणी घेण्याची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. पाणी उपसा सुरळीत सुरू असतानाच जायकवाडी वसाहतीजवळील स्मशानभूमी परिसरातील मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह फुटल्याचे निदर्शनास आले.

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका दिवसभरात १,१४९ वाहनचालकांवर कारवाई; १३.८४ लाख रुपयांचा दंड वसूल

फुटलेल्या व्हॉल्व्हमुळे कामाला बसला ब्रेक

परिणामी, जॅकवेलपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील जलवाहिनी रिकामी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागले. जलवाहिनीतील पाणी पूर्णपणे बाहेर काढण्यासाठीच अनेक तास लागले. त्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात आली. तब्बल २४ तासांच्या प्रयत्नांनंतर शनिवारी सायंकाळी काम पूर्ण झाले आणि लगेचच पंपिंग सुरू करण्यात आले.

नक्षत्रवाडी केंद्रात होणार पाण्याची प्रक्रिया

जॅकवेलमधून सोडण्यात आलेले पाणी मुख्य जलवाहिनीद्वारे नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचणार आहे. तेथे पाण्यावर आवश्यक प्रक्रिया करून ते एमबीआरमध्ये साठवले जाईल. त्यानंतर वितरण व्यवस्थेद्वारे शहरातील विविध भागांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या योजनेच्या मदतीने आणि नव्या योजनेतील उपलब्धतेनुसार पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

सिडको-हडकोसाठी महत्त्वाचे कनेक्शन पूर्ण

नव्या योजनेतील पाणी सिडको हडको भागापर्यंत पोहोचवण्यासाठी एन-५ परिसरातील जलकुंभांशी जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. एन-२ आणि एन-३ या जलकुंभांना क्रॉस कनेक्शन देण्यात आले असून १५०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याचा मार्ग खुला झाला आहे. एक्सप्रेस लाईनवरून शनिवारी रात्रीपासून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. उर्वरित तांत्रिक कामे पुढील दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

संभाजीनगरमध्ये अनधिकृत नळधारकांचे धाबे दणाणले, पोलीस बंदोबस्तात मनपाची हाय-व्होल्टेज कारवाई; ८ दिवसांचा अल्टिमेटम!

Web Title: Chhatrapati sambhajinagar new water supply scheme repairs complete pumping restarts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis
  • Water supply

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
2

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Bail Pola 2026: ‘पावसाची आस, बळीराजाचा श्वास’; बैलांच्या अंगावर दुष्काळाची व्यथा, अहिल्यानगरमध्ये पोळ्यावर संकटाचे सावट
3

Bail Pola 2026: ‘पावसाची आस, बळीराजाचा श्वास’; बैलांच्या अंगावर दुष्काळाची व्यथा, अहिल्यानगरमध्ये पोळ्यावर संकटाचे सावट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.