Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana: दोन महिने उलटले, पण हप्ता नाहीच; लाभार्थी महिलांचा सरकारविरोधात संताप

Ladki Bahin Yojana News: मार्च आणि एप्रिल असे सलग दोन महिने उलटूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात हफ्ता जमा न झाल्याने महिलांमध्ये नाराजी तसेच संताप उफाळून आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 06, 2026 | 07:33 PM
Ladki Bahin Yojana: दोन महिने उलटले, पण हप्ता नाहीच; लाभार्थी महिलांचा सरकारविरोधात संताप
Follow Us
Follow Us:

 

  • दोन महिने उलटले, पण हप्ता नाहीच
  • लाभार्थी महिलांचा सरकारविरोधात संताप
पैठण (वा.) राज्य सरकारची गाजलेली ‘लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) सध्या पैठणसह जिल्ह्यामध्ये अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र आहे. मार्च आणि एप्रिल असे सलग दोन महिने उलटूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात हफ्ता जमा न झाल्याने महिलांमध्ये नाराजी तसेच संताप उफाळून आला आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल या आशेवर अनेक महिलांनी लग्न समारंभतसेच घरखर्चाचे नियोजन केले होते. परंतु सलग दोन महिन्यांपासून शासनाकडून पैसे मिळाले नसल्याने या महिलांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. विशेषतः गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना आधार ठरली आहे. मात्र दोन महिन्यांपासून हफ्ता न मिळाल्याने गरजू महिला अडचणीत सापडल्या आहेत.

दरम्यान, शासनाने केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यामुळे महिलांची अधिकच गैरसोय होत आहे. प्रलंबित हफ्ता नेमका केव्हा मिळणार, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. त्यामुळे महिलांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

तुम्हीही ‘लाडकी बहिणी’तून चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले? तर आता वसूली झाली सुरु, तब्बल 11 कोटी…

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी शासनाने पुढील अटी लागू केल्या आहेत त्यात लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे, बँक खाते आधारशी संलग्न असणे बंधनकारक, केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक एका कुटुंबातील मर्यादित लाभार्थीनाच लाभ शासकीय कर्मचारी व आयकरदाते अपात्र मात्र, या सर्व अटी पूर्ण करूनही प्रत्यक्षात लाभ मिळत नसल्याने “नियम कडक, पण सेवा ढिसाळ” अशी टीका होत आहे.

तातडीने दखल घेण्याची मागणी

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आता पाच वर्षे ग्रामपंचायत वगळता स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुख्य निवडणुका होणार नाहीत. परिणामी शासनाकडून आता लाडकी बहीण योजनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा सध्या महिलांमध्ये रंगली आहे. राज्य सरकारने महिलांच्या खात्यात तत्काळ पंधराशे रूपये जमा करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Ladki Bahin Movie Trailer : लाडक्या बहिणींचा लाडका चित्रपट! गौतमी पाटीलचा नवाकोरा सिनेमा; ट्रेलर झाला Launch

Web Title: Ladki bahin yojana pending installment paithan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Ladki Bahin Yojana
  • Paithan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.