Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांचे काम वेगात, विखे पाटलांचे कौतुक; पण मनोज जरांगे यांनी व्यक्त केली ‘ही’ मोठी शंका

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ५८ लाख कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कामाचे कौतुक केले असून सर्व निर्णयांच्या लेखी आदेशांची मागणी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 04, 2026 | 02:19 PM
मनोज जरांगे यांनी व्यक्त केली 'ही' मोठी शंका (Photo Credit- X)

मनोज जरांगे यांनी व्यक्त केली 'ही' मोठी शंका (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांचे काम वेगात
  • विखे पाटलांचे कौतुक
  • पण मनोज जरांगे यांनी व्यक्त केली ‘ही’ मोठी शंका
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): हैद्राबाद गॅझेटमधील ५८ लाख कुणबी नोंदीधारकांना प्रमाणपत्रे देणे तसेच यापूर्वी वितरित केलेल्या प्रमाणपत्रांची वैधता निश्चित करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम राज्य सरकारने, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्के मनावर घेतल्याचे दिसत आहे. सध्या ही जलदगतीने सुरू असून, नुकत्याच झालेल्या आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सात ते आठ मंत्र्यांची उपस्थिती होती. यावरून सरकारची गंभीरता दिसून येत असल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिली. मात्र, प्रक्रिया सुरू असली तरी ती अर्ध्यावर येऊन थांबणार नाही ना, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

जरांगे हे शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, बुधवारी सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकारने काही मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असली तरी अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप निकाली निघाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत, शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ आणि मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करण्याबाबतची माहिती मिळाली असली तरी ती अद्याप अधिकृत झालेली नाही. मात्र, या विषयांवर चर्चा सुरू असून सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा कारखाना आणि फसवणुकीचा ब्रँड,” विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका

नोंदीधारकांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून शासनाची यंत्रणा घरोघरी जाऊन प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, कुणबी नोंदी नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही याबाबत अधिकृत आदेशाची प्रतीक्षा असल्याचे सांगत सरकारने सर्व निर्णय लेखी स्वरूपात द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

विखे पाटलांचे कौतुक

आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील चांगले काम करत असून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ मिळत असल्याचेही जरांगे यांनी नमूद केले. ५८ लाख कुणबी नोंदींच्या पडताळणी व प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेसाठी प्रशासनाने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले असून, जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सचिव स्तरावरून स्पष्ट आदेश काढणे आवश्यक

लवकरच शाळा, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सचिव स्तरावरून स्पष्ट आदेश काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maratha Reservation वर दादा भुसे यांचे वक्तव्य, “सरकार मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील”

Web Title: Manoj jarange patil on kunbi records certificate distribution maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Kunbi
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

‘जरांगे रिअॅलिटी शोमधले कलाकार; एकनाथ शिंदे प्रोड्युसर तर उदय सामंत डायरेक्टर’, गुणरत्न सदावर्तेंचा घणाघात
1

‘जरांगे रिअॅलिटी शोमधले कलाकार; एकनाथ शिंदे प्रोड्युसर तर उदय सामंत डायरेक्टर’, गुणरत्न सदावर्तेंचा घणाघात

Manoj Jarange Patil : ‘ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर घणाघात, मराठा आरक्षण मुद्द्यावरून संघर्ष
2

Manoj Jarange Patil : ‘ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर घणाघात, मराठा आरक्षण मुद्द्यावरून संघर्ष

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
3

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
4

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.