मुंबई : राज्य सरकारमध्ये (State Government Decision) निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत जनहिताचे विविध निर्णय झपाट्याने घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार १ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ३९९ फाईल्सचा निपटारा केला आहे. विशेष म्हणजे यात नैसर्गिक आपत्तीमधील मदत (Help To Natural Calamity Affected Persons), गरजूंना मदत, कृषि विभाग, मंत्री मंडळासमोर आणण्यासाठीचे प्रस्ताव, फाईल्स, विविध नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागाच्या फाईल्सचा समावेश आहे.
[read_also content=”सलीम फ्रूटची ५० लाखांची फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://www.navarashtra.com/crime/fraud-with-salim-fruit-nia-arrested-three-persons-nrsr-313573.html”]
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत विविध विभागाच्या सचिवांना सर्वसामान्यांची तसेच जनहिताची कामे गतिमान रीतीने झाली पाहिजेत तसेच लोकांची कामे अडणार नाहीत हे पाहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जनहितासाठी तत्परतेने निर्णय घेण्यात येत आहेत.