मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर त्यांनी शिंदे गट स्थापन करत भाजपाबरोबर सरकार स्थापन केले. यानंतर आमदारांच्या (MLA) बंडानंतर आता खासदार आणि नगरसेवकांनी (MP and corporators) शिंदे गटात सामील होण्याचा सपाटा लावला आहे. ठाणे, कल्याण, उल्हासनगरनंतर आता मीरा भाईंदरमधील १८ नगरसेवकांनी (Mira Bhayander corporators) शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली.
[read_also content=”बंगला स्मारकात रुपांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण, मुंबई मनपाचा उच्च न्यायालयात दावा https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-municipal-corporation-claims-in-the-high-court-that-the-legal-process-of-conversion-to-bangla-smarak-has-been-completed-304275.html”]
सगळ्या स्तरातील लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. हिंदूत्वाच्या भूमिकेला नगरसेवकांनी समर्थन दिलं असल्याचं शिंदे म्हणाले. तसेच शिंदे गटात सामील झालेल्या या नगरसेवकांचं शिंदे यांनी स्वागत केलं आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, असंही त्यांनी नमूद केलं. आम्ही लोकहिताचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असंही ते म्हणाले.