संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यात आता भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) आणि माजी उपसरपंच यांच्यातील वाद समोर आला आहे.
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरवण्यात आला होता. यादरम्यान प्रशांत बंब आणि माजी उपसरपंच यांच्यात वाद झाला. आमदारांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याने माजी उपसरपंच आक्रमक झाले होते. त्यावरून या दोघांमध्ये वादावादी झाली.
बंब आणि माजी उपसरपंच यांच्या वाद हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या जनता दरबारमध्ये ग्रामपंचायतीच्या कारभारावर आमदार महोदयांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावरून हा वाद झाला.