विविध सोसायट्यांमध्ये नागरिकांशी थेट संवाद; विकासकामांवर विश्वास व्यक्त
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ०९ अंतर्गत रॉयल सिरीन सोसायटी (म्हाळुंगे), ब्रावरिया सोसायटी (बालेवाडी), एलिट सोसायटी तसेच यशाईन सोसायटी (सुस) येथे प्रचारार्थ भेटी देत नागरिकांशी सखोल, विश्वासपूर्ण संवाद साधण्यात आला. या भेटीदरम्यान प्रभागातील दैनंदिन समस्या, मूलभूत सुविधा, भविष्यातील गरजा आणि दीर्घकालीन विकासदृष्टी यावर नागरिकांनी स्पष्टपणे मते मांडली.
या प्रचार दौर्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांनी नागरिकांना विश्वासाने आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले.
विविध सोसायट्यांमधील संवादातून नागरिकांनी ठामपणे अधोरेखित केले की, प्रभागात प्रत्यक्षात राबविण्यात आलेली विकासकामे, नागरिकांच्या प्रश्नांची वेळेवर घेतलेली दखल, सातत्यपूर्ण संपर्क आणि समस्या सोडविण्याची कार्यपद्धती ही त्यांच्या कार्यशैलीची मोठी ताकद आहे. नागरिकांनी व्यक्त केलेला सकारात्मक प्रतिसाद हा पुढील काळातील जबाबदारी अधिक ठामपणे स्वीकारण्यास प्रेरणा देणारा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, बालेवाडी परिसरात सहजयोग परिवारासोबतही संवाद साधण्यात आला. ध्यान, आत्मशुद्धी आणि सकारात्मकतेच्या माध्यमातून समाजात सद्भावना, आरोग्य व सुसंस्कार रुजविणाऱ्या या मूल्याधिष्ठित कार्याला शुभेच्छा देत उपस्थित सदस्यांशी मनमोकळा संवाद साधण्यात आला. अशा भेटी समाजकार्यास अधिक बळ देतात, अशी प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा विश्वास, सहकार्य आणि आपुलकी हीच खरी ताकद असून, पुढील काळातही सातत्याने आणि परिणामकारकपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
हेदेखील वाचा : Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद






