मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारी संदर्भात घेतली आढावा बैठक (फोटो- ट्विटर)
राज्यातील विविध भागातून पालख्या पंढरपूरला येतात. नाशिक, विदर्भ, मराठवाडा याठिकाणाहून येणाऱ्या पालख्यांना पालखी मार्गात सोयीसुविधा देण्यासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी समन्वयांनी बैठक घेवून उपाययोजना कराव्यात. आपापल्या जिल्ह्यातून पालख्या जाताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, वीज, पोलीस बंदोबस्त, आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी तत्काळ बैठका घेवून नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting on the preparedness for 'Ashadhi Ekadashi in Pandharpur'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'पंढरपूर येथील आषाढी एकादशी'च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठकीला सुरुवात
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता… pic.twitter.com/QgMXf6J69B— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 28, 2025
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🚩
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आषाढी एकादशीच्या अनुषंगाने आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीदरम्यान वारकरी संप्रदायाच्या दिंडी प्रमुखांकडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिंडी प्रमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… pic.twitter.com/3Vy4O2s14C
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 28, 2025
यावेळी वारकरी, पालख्यासाठी विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने केलेल्या सोयीसुविधांबाबतची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली. यावेळी विविध पालखी संस्थानच्या वतीने योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर महाराज, जालिंदर मोरे, सोमनाथ घाटेकर, अक्षय महाराज भोसले, साधू यांनी समस्या, सूचना मांडल्या.