(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर प्रचंड प्रमाणात वाढला असून अनेकदा भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना पाहायला मिळतात. आता मुळशी पॅटर्न मधील पिट्या भाई म्हणजेच रमेश परदेशी यांना देखील कुत्रा चावला आहे. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
अभिनेते रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, टेकडीवर कोण असायला हवे ससे. मोर, फिरायला येणारी तरुण, लहान मुले.वृद्ध मालकांसोबत येणारी पाळीव प्राणी,वृक्ष प्रेमी की #भटकी_कुत्री?”
”काल नेहमीप्रमाणे ARAl टेकडीवर पळायला गेलो होतो पळत असताना एका ठिकाणी 4 ते 5 कुत्री खात होती तिथून जाताना त्यातल्या एका कुत्र्याने माझ्या मांडीचा चावा घेतला. मी तसचं पुढे गेलो तर माझ्यासारखाच एक प्राणी प्रेमी मित्र 10 ते 12 कुत्र्यांना खायला देत होता (मी पण कधी कधी सीटी मध्ये उपाशी कुत्र्यांना पाव,बिस्किट देत असतो) मी त्याला बोललो अरे ईथे नको देऊ खायला मला आताच एक कुत्रे मागे चावलाय. मेन रोड वर दे नाहीतर हे लहान मुले. वृद्ध ह्यांच्या अंगावर येतात आणि मी निघून गेलो.”
पुढे त्यांनी लिहिले,” घरी आल्यावर आंघोळ करताना लक्षात आले आपल्याला मगाशी किरकोळ चावलय अस वाटलेले ते जास्त दुखतंय. म्हणुन सकाळी सरकारी दवाखान्यात गेलो तर त्यांनी सांगितले टोटल 5 इंजेक्शन घ्यावी लागतील काही तरी टाइप 3 आहे म्हणुन. आता 2 घेतली अजून 7 दिवसाच्या अंतराने बाकी घ्यायची आहेत.. हेच एखाद्या लहान मुलाला किंवा वृद्ध माणसाला चावले असते तर केवढ्याला पडले असते… ? ”
”मी पण प्राणी प्रेमी आहे पण मला वाटतय ह्या भटक्या कुत्र्यांची काहीतरी बरी सोय केली पाहिजे राहणे खाण्याची आज एक अंगावर आला चावला मी प्रतिकार करू शकलो पण 10/12 एकदम अंगावर आले तर बरे वाईट काही झाले तर जबाबदार कोण अजून खूप जबाबदाऱ्या अंगावर आहेत.माननीय आणि शहरातल्या भटक्या कुत्र्यांना जर एका ठिकाणी जमा केले आणि त्यांची नसबंदी केली तर pmc च काम पण एका ठराविक ठिकाणी रीतसर आणि सुसह्य होईल जे कोणी प्रणिप्रेमी मित्र आहेत ते त्या ठिकाणी येऊन त्यांच्याशी खेळतील त्यांचं आजारपण डॉकटर सगळं एकाठिकाणी होईल. मानस रस्त्यावर आणि टेकडीवर सुरक्षित फिरतील, कुत्री घाबरून भीतीपोटी त्यांच्यावर attack करणार नाहीत, माणसाचा आणि कुत्र्याचा दोघांचा जीव अतिशय महत्वाचा आहे दोन्ही जीव सुरक्षित राहतील.सरकारला विनंती आहे की त्यांनी ह्याची दखल घ्यावी नगरसेवक,आमदार,महापौर सर्वांना विनंती आहे की भटक्या कुत्र्यांची काही तरी चांगली सोय करावी. ह्या मुक्या प्राण्यांवर पण अन्याय होणार नाही आणि ते पण छान जगतील आणि बाकी नागरिक सुद्धा छान जगतील..” शेवटी त्यांनी, ”परमेश्वर करो आता रेबीज वैगरे नको व्हायला”, अशी आशा व्यक्त केली आहे.






