After the Chief Minister's statement, 17 lakh government employees are preparing to withdraw their strike
ठाणे : गणेशोत्सव आणि त्यानंतर नवरात्रोत्सवात (Navratri festival) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे गणपती तसेच देवीच्या दर्शन घेत असल्याचे अनेकांनी पाहिले. दरम्यान, मागील नऊ दिवस शिंदे हे अनेक मंडळांना भेटी देत होते, मात्र काल बीकेसीतील दसरा मेळाव्यामुळं (Dasara melava) त्यांना काल कुठेही जात आलं नाही, मात्र ठाण्यात एका मंडळानं मुख्यमंत्री देवीच्या (Devi) दर्शनाला येणार होते, मात्र कालपर्यंत आलेच नाहीत, त्यामुळं या मंडळाने चक्क देवीचे विसर्जनच केलं नाही, त्यामुळं हा विषय चर्चेचा ठरत असून, यावर चर्चा होताना दिसत आहेत.
[read_also content=”शिवतीर्थावर गद्दार, खंजीर, खोके याव्यतिरिक्त काहीच नव्हतं, संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टिका https://www.navarashtra.com/maharashtra/sandeep-deshpande-criticism-on-uddhav-thackeray-about-shivaji-park-dasara-melava-333231.html”]
दरम्यान, ठाण्यातील कळवा-विटावा येथील सूर्यनगर भागातील नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे (Navadurga Charitable Trust) दरवर्षी नवरोत्रौत्सव थाटामटात साजरा करण्यात आला. आपल्या मंडळातील देवीचे दर्शन घ्यावे अशी मागणी मंडळाकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांना 9 दिवस देवीच्या दर्शनासाठी वेळच मिळाला नाहीय, त्यामुळं मंडळातील कार्यकर्त्ये नाराज झाले असून, आपल्या मंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेट देऊन दर्शन घेत नाहीत, तोपर्यंत देवीच विसर्जन करणार नाही असा पण नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्ट या मंडळाकडून केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या देवीचे दर्शन घेणार की, नाही याची सर्वांना उत्सुकता आहे.