बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश वडवणी पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली. न्यायालायने त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दीड महिन्यात पोलिसांची ही दुसरी कारवाई असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय प्रकरण?
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील ज्ञानेश्वर रोमन हा तरुण मजुरी करून उदरनिर्वाह करतो. विवाहासाठी त्याने ओळखीतील महादेव घाटे या व्यक्तीकडे योग्य मुलगी पाहण्याची विनंती केली. महादेवने त्यांच्या संपर्कातून जालना जिल्ह्यातील एका मुलीला व तिच्या आईला ज्ञानेश्वरच्या घरी बोलावले. दोघांची ओळख करून देत हा विवाह ठरल्याचे सांगण्यात आले. यावेळी महादेवसह इतर दोन जणांनी ज्ञानेश्वरकडून पैशांची मागणी केली. सुरुवातीला दोन लाख रुपये मागण्यात आले, मात्र तडजोडीनंतर १ लाख 70 हजार रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे 10 ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वरचा बनावट विवाह करून देण्यात आला.
दोन महिला आणि एक पुरुष अटकेत
लग्नानंतर आठवडाभरातच मुलीच्या घरच्यांनी तीला घेण्यासाठी येण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने ज्ञानेश्वरला काहीतरी चुकीचे असल्याची जाणीव झाली. त्याने तातडीने वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपासादरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक केली.
अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात ही टोळी संघटित असल्याचा संशय असून आणखी काही आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान, याच टोळीने अन्य तरुणांचीही फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे कोणाचीही अशी फसवणूक झाली असल्यास वडवणी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन
पिंपरी चिंचवड शहरात हुंड्याच्या छळामुळे एका २६ वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याच समोर आलं आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव दिव्या हर्षल सूर्यवंशी असे आहे. नवरा आणि सासरच्या कुटुंबाच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. दिव्याचा नवरा आयटी अभियंता असून तो एका शिक्षकांचा मुलगा असल्याचं बोललं जात आहे. ही धक्कादायक घटना वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील उच्चभ्रू सोसायटीतील काल संध्याकाळी घडली आहे. दिव्या सूर्यवंशी हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र दिव्याने आत्महत्या केली नसून तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळीने तिचा खून केल्याचा आरोप दिव्याच्या माहेरच्या नातेवाईकानी केला आहे.
गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई