• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Cng Truck Leakage At Near Bus Stand At Islampur

Islampur News: इस्लामपुरात CNG वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरला गळती; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

गॅस गळती सुरू असतांना हाकेच्या अंतरावर असणाऱ्या खाद्य पदार्थ बनवणाऱ्या हातगाड्या चालकांची धांदल उडाली. इथे हातगाड्यांची ही संख्या अधिक आहे. ही घटना घडली तेव्हा  अनेकांच्या गॅस शेगड्या सुरू होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 25, 2024 | 08:03 PM
Islampur News: इस्लामपुरात CNG वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरला गळती; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रकला गळती (फोटो- टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इस्लामपूर:  इस्लामपूर बस स्थानकासमोरील रस्त्यावर सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडर पाईपला अचानक गळती लागल्याने प्रचंड घबराट निर्माण झाली. मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या दरम्यान हा प्रकार घडला. तब्बल अर्धातास गळती सुरू राहिल्याने मोठ्या प्रमाणावर सीएनजी हवेत मिसळला. संपूर्ण सिलेंडर्स रिकामी झाल्याने परिसरातील वातावरण प्रदूषित झाले.गळती झालेल्या सीएनजीने पेट घेतला असता तर मोठी हानी झाली असती. सीनजी पेटला नसल्याने अनेकांनी सुटेकचा निःश्वास टाकला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ; वाघवाडी फाटा येथून सीएनजी रिफिलींग करून ट्रक क्रं ( एचआर ५५ पी ६१९१  ) हा कलेढोण ( कवठेमहांकाळ) ला निघाला होता. इस्लामपूर बस स्थानकासमोर आल्यावर ट्रक वरील रॅकवर फिट केलेल्या सीनजी सिलेंडरच्या पाईपला अचानक गळती सुरू झाली.जोरदार प्रेशरने सिनजीचे हवेत फवारे उडत होते. मोठा आवाज करत सीनजी मिसळला जात होता. हे पाहून नागरिकांनी आरडाओरडा केली. या आवाजाने चालक आणि सहाय्यक चालकांने गाडी थांबवली. प्रचंड प्रमाणात गॅस गळतीचा आवाज येत असल्याने लीक होणाऱ्या सीएनजी सिलेंडर्सचे स्विच बंद करण्याचे प्रयत्न केले. पण संपूर्ण सीएनजी हवेमध्ये मिसळला गेल्याने सीनजी हवेत मिसळण्याचे प्रेशर हळू हळू कमी होत गेले. दरम्यान काही सतर्क नागरिकांनी पोलीस व अग्निशमन दलाला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अचानकपणे सुरू झालेल्या सीनजी गळतीच्या भीतीने इस्लामपूर बस स्थानक परिसरातील नागरिकांची धावाधाव झाली. आजूबाजूला असणाऱ्या हातगाडी व वडापाव व्यवसायिकांनी तातडीने गॅस सिलेंडर बंद केले.  मोठ्या प्रेशरने आवाज करत सीनजी हवेत मिसळला जात होता. चालकाने वाघवाडी फाटा येथील रिफिलिंग करणाऱ्या युनिटमध्ये तातडीने फोन करून टेक्निशियन बोलवून घेतले. तोपर्यंत रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नेमके काय झाले अनेकांना समजत नव्हते. जा-ये करणाऱ्या लोकांना याची दाहकता माहित नसल्याने त्यांची गर्दी वाढली होती.  पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत  संबंधित सीनजी गळती लागलेला ट्रक तातडीने शहराच्या बाहेर वाघवाडी रस्त्याला नेण्यास चालकाला भाग पाडले.

इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. सीएनजीने पेट घेतला तर मोठा अनर्थ घडेल या भीतीपोटी परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरून व घटनास्थळापासून दूर जाणे पसंत केले.  घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप यादव,पोलीस नाईक शरद बावडेकर,पोलीस कॉन्स्टेबल सचिन मोरे व पंकज कांबळे यांनी धाव घेत वाहतुकीचे नियोजन केले. व गळती लागलेला ट्रक तातडीने शहराच्या बाहेर काढला.

 लाईट नव्हती म्हणून..!

बस स्थानकाच्या समोर पेठ सांगली रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या गटारींची कामे सुरू आहेत. तसेच बस स्थानकाच्या आवारात काँक्रीटीकरण सुरू असल्याने एकाच प्रवेशद्वारातून एसटीची ये-जा सुरू असते. याच प्रवेशद्वा समोर नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. तिथेच ट्रक दुर्घटनाग्रस्त होवून सीएनजी मोठ्या प्रमाणात गळती होत होता.
वाहतूक कोंडी नसल्याने काही क्षणात रस्ता व बस स्थानकाचा परिसर निर्मनुष्य झाला. आज मंगळवार असल्याने लोड शेडिंग होते सर्वत्र विद्युत पुरवठा खंडित होता. नाहीतर सीनजीचे फवारे विद्युत तारेवर जात होते. तिथे प्रवाह सुरु असता तर आग लागली असती तर काय झाले असते याची घटनास्थळी चर्चा होती.

गॅस शेगड्या सुरू असणाऱ्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले..!

गॅस गळती सुरू असतांना हाकेच्या अंतरावर असणाऱ्या खाद्य पदार्थ बनवणाऱ्या हातगाड्या चालकांची धांदल उडाली. इथे हातगाड्यांची ही संख्या अधिक आहे. ही घटना घडली तेव्हा  अनेकांच्या गॅस शेगड्या सुरू होत्या. गोंधळ उडाल्यानंतर सर्वच हातगाडी चालकांनी शेगड्या बंद करून सिलेंडर सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी धावाधाव केली. मोठी आग लागू शकते. मोठा धोका होऊ शकते याची जाणीव झाल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी होत्या. दुर्घटनागस्त ट्रक शेजारी रिक्षा थांबा असल्याने तिथे दहा ते बारा रिक्षा थांबून होत्या. रिक्षात बसलेल्या चालकांनी गॅस गळती सुरू होताच गाड्या सोडून सुरक्षित जाणे पसंत केले. सर्वच रिक्षा सीनजीवर असल्याने आग लागून मोठा धोका निर्माण होईल या भीतीने रिक्षाचालक भीतीने गांगरून गेले होते.
चौकट ;

गॅस गळतीचा पक्षी व मुक्या प्राण्यांना त्रास..!

इस्लामपुरात झालेल्या गॅस गळतीचा परिणाम एक किलोमीटर अंतरावर दिसून आला. वाऱ्याच्या झोताने बसस्थानकाच्या पूर्वेकडील बाजूला सीएनजी संपूर्ण गॅसचा वास पसरला होता. बसस्थानक परिसरामध्ये असणाऱ्या झाडांवर वास्तव्यास असणाऱ्या अनेक पक्षांना याचा प्रचंड त्रास झाला. हे पक्षी आकाशात सैरभैर फिरत होते. रस्त्याने जाणाऱ्या मोकाट कुत्र्यांनाही गॅस गळतीचा फटका बसला. अनेक श्वान मूर्च्छित पडली होती.

Web Title: Cng truck leakage at near bus stand at islampur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 08:03 PM

Topics:  

  • Islampur

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Womens Day 2026: स्त्री तुझा गौरव अन् ‘स्त्रीत्वाचा’ उत्सव; महिला दिनानिमित्त वाचा ‘या’ खास दिवसाचा इतिहास आणि महत्व

Womens Day 2026: स्त्री तुझा गौरव अन् ‘स्त्रीत्वाचा’ उत्सव; महिला दिनानिमित्त वाचा ‘या’ खास दिवसाचा इतिहास आणि महत्व

Mar 08, 2026 | 05:30 AM
तू आदिशक्ती तूच महाशक्ती वरदायिनी…! महिला दिनानानिमित्त पाठवा खास मराठमोळ्या सुंदर शुभेच्छा

तू आदिशक्ती तूच महाशक्ती वरदायिनी…! महिला दिनानानिमित्त पाठवा खास मराठमोळ्या सुंदर शुभेच्छा

Mar 08, 2026 | 05:30 AM
एसआर शाळा ठरली १४ पारितोषिकांची मानकरी! राज्यस्तरीय परीक्षेसाठी विविध विषयांकरिता ४३ विद्यार्थ्यांची निवड

एसआर शाळा ठरली १४ पारितोषिकांची मानकरी! राज्यस्तरीय परीक्षेसाठी विविध विषयांकरिता ४३ विद्यार्थ्यांची निवड

Mar 08, 2026 | 04:15 AM
मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

Mar 08, 2026 | 02:35 AM
दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Mar 08, 2026 | 12:30 AM
30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

Mar 07, 2026 | 10:07 PM
Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Mar 07, 2026 | 09:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.