वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये कॉंग्रेस आमदार मुलगा प्रीतम पाटीलला अटक करण्यात आली आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. घरगुती हिंसाचार आणि हुंडाबळीची शिकार ठरलेल्या वैष्णवीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक बाब समोर आल्या आहेत. वैष्णवीच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खूणा देखील दिसून आल्या आहेत. या प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये एका कॉंग्रेस आमदाराच्या मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतले आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये तिची सासू, नणंद आणि नवऱ्याला अटक करण्यात आली होती. मात्र तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे हे फरार होते. सात दिवस फरार असणाऱ्या या हगवणे पिता-पुत्राला शोधण्यासाठी पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न केले. पोलिसांच्या सहा तुकड्या या दोघांचा शोध घेत होती. यावेळी वेगवेगळ्या महागाड्या गाड्या बदलून दोघेजण पोलिसांना चकवा देत होते. यावेळी ते काहींच्या शेतांमध्ये तर लॉन्समध्ये राहत होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजेंद्र आणि सुशील हगवणे या दोघांना आसरा देणे हे लोकांना भोवले आहे. त्यांना आसरा देणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच यामध्ये एक कॉंग्रेस आमदारांचा देखील समावेश आहे. प्रीतम वीरकुमार पाटील (वय 47) कोगनोली, (तहसील चिकोडी) बेळगाम, कर्नाटक. राहुल दशरथ जाधव (वय 45) पुसेगाव, खटाव, सातारा. अमोल विजय जाधव (वय 35) पुसेगाव, खटाव, सातारा. बंडू लक्ष्मण फटक (वय 55) लोणावळा. मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे, वय 60, वडगाव-मावळ असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यामध्ये प्रीतम वीरकुमार पाटील हा कॉंग्रेस आमदारांचा मुलगा आहे.
प्रीतम वीरकुमार पाटील याला अटक करण्यात आली आहे. तो कॉंग्रेस आमदार वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे. वीरकुमार पाटील हे कर्नाटकमधील कॉंग्रेसचे माजी मंत्री राहिले आहेत. 28 वर्षे कॉंग्रेस आमदार राहिलेले वीरकुमार पाटील हे उर्जामंत्री देखील होते. हगवणे फरार असताना त्याला मदत करणाऱ्या पाच जणांना कोर्टात हजर केले जाणार आहे. यामध्ये प्रीतम पाटील देखील असणार आहे. वैष्णवी हगवणे हिच्या नणंदेच्या आणि सासूच्या कोठडीमध्ये वाढ देखील करण्यात आली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रीतम वीरकुमार पाटील हे कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरकुमार पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. वीरकुमार पाटील यांना दोन मुलगे आणि दोन मुली आहेत. प्रीतम कडे कला शाखेची पदवी असूनजातिवंत घोडे पाळण्याचा आणि कारचा शौक आहे. त्यांच्याकडे जातिवंत घोडे असून अत्यंत आधुनिक वेगवेगळ्या कार्स त्यांच्याकडे आहेत.प्री तम हे माजी तालुका पंचायत सदस्य आहेत. काँग्रेस पक्षाचे प्रीतम हे कार्यकर्ते आहेत. गावातील अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. तरुण वर्गामध्ये प्रीतम पाटीलची जोरदार चर्चा असून आता हगवणे प्रकरणामध्ये कोर्टात हजर केले जाणार आहे.