सोलापूर : आगामी लोकसभा निवडणूकांसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कॉंग्रेस पक्ष देखील मागे नाही. महाविकास आघाडीमध्ये (MVA) सामील असलेल्या कॉंग्रेसची (Congress) रणनीती आणि प्रचार याबाबत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी माहिती दिली आहे.सोनिया गांधी(Sonia Gandhi) या पळून जाणाऱ्या नेत्या नाहीत त्या सुधारणा करतील तसेच यापुढील निवडणूका बॅलेट पेपर वर घेण्यात याव्या अशी मागणी देखील सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे.
आगामी निवडणूकांच्या तयारीबाबत माहिती देताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “मी सध्या त्या रणनीतीकारामध्ये मध्ये नाहीये, पराभव होतोय म्हणून पळून जाता कामा नये,सोनिया गांधी या पळून जाणाऱ्या नेत्या नाहीयेत,त्याच्यामध्ये सुधारणा करून वेगवेगळा मार्ग त्या आणतील याविषयी माझ्या मनामध्ये कांही शंका नाही.” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच बॅलेट पेपर वरती मतदान झाले पाहिजे ही काँग्रेसची पण मागणी आहे.पण सरकारच्या हातात सगळं आहे.मला सुद्धा विश्वास आहे सरकार सकारात्मक विचार करेल. अशी मागणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे.
राम मंदिराबाबत देखील त्यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले,”राम मंदिरावरून मी भाजपला काय संदेश देणार तेच संदेश देण्याचं काम करतात. 22 तारखेला जो कार्यक्रम आहे ते करतील तो त्यांचा कार्यक्रम आहे. राम मंदिराच्या भावना प्रत्येकाच्या आहेत त्याला विरोध करायचं प्रश्न नाही. पण राम सर्वांचा आहे, हिंदू-मुसलमानांचा देखील आहे आणि राष्ट्रवादी हिंदूंना देखील प्रिय आहे. राम मंदिर कार्यक्रमाला पक्षीय स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला आमचा विरोध असणार आहे. धार्मिक मनातून जी शक्ती द्यावी लागते त्याच स्वागतच आहे. पण रामाचा सर्व हक्क भाजप घेऊ शकत नाही.राम ही त्यांना घेऊ देणार नाही.” असे कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी ठणकावून सांगितले आहे.