मुंबई : राज्यात कोरोचा कहर सुरुचं आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. आज राज्यात एका दिवसात ४००४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात ३ हजार ८५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात बरे होण्याचे प्रमाण ९८.८४ टक्के आहे.
दरम्यान आज दिवसभरात एका कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या १,४७,८८६ इतकी झाली आहे. तर राज्यात सध्या २३, ७४६ इतके कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.
[read_also content=”दररोज पांढरा भात खात असाल तर ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष… https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-eat-white-rice-every-day-pay-attention-to-these-things-nrdm-294491.html”]
मुंबई विभाग –
मुंबई महापालिका क्षेत्र, ठाणे, ठाणे महापालिका, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी निजामपूर महापालिका, मिरा भाईंदर महापालिका, पालघर, वसई-विरार महापालिका, रायगड, पनवेल महापालिका या परिसरात ३३५८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
[read_also content=”हनिमूनची पहिली रात्र अन् पतीचं ‘ते’ सत्य उघड https://www.navarashtra.com/crime/on-the-first-night-of-honeymoon-the-truth-of-anpati-is-revealed-nrdm-294517.html”]
पुणे विभाग –
पुणे महापालिका, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, सोलापूर, सोलापूर महापालिका, सातारा आदी क्षेत्रांत ४०८ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
कोल्हापूर विभाग –
कोल्हापूर, कोल्हापूर महापालिका, सांगली, सांगली महापालिका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या क्षेत्रात ४३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.
नाशिक विभाग –
नाशिक, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, अहमदनगर, अहमदनगर महापालिका, धुळे, धुळे महापालिका, जळगाव, जळगाव महापालिका, नंदुरबार आदी परिसरात कोरोनाचे ६० नवीन रुग्ण आढळले.
औरंगाबाद विभाग –
औरंगाबाद, औरंगाबाद महापालिका, जालना, हिंगोली, परभणी, परभणी महापालिका या भागांत ११ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
लातूर विभाग –
लातूर, लातूर महापालिका, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड महापालिका या भागात १३ नवीन कोविडचा संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहेत.
अकोला विभाग –
अकोला, अकोला महापालिका, अमरावती, अमरावती महापालिका, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या परिसरात २४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.
नागपूर विभाग –
नागपूर, नागपूर महापालिका, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर महापालिका, गडचिरोली आदी भागात ८७ नवीन कोरोनाबाधित आढळले.