फोटो सौजन्य: iStock
संतोष पेरणे/कर्जत: कर्जत तालुक्यातून वाहणारी उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे 40 वर्षांपूर्वी 110 मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला होता. आता त्याच पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 25 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी जाऊन वाहतूक बंद होत होती. मात्र सध्या बांधण्यात येत असलेल्या पुलाची उंची जुन्या पुलापेक्षा फार अधिक नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नवीन पुलाची उंची जुन्या पुलाच्या उंचीपेक्षा किमान दहा फूट वाढण्याची अपेक्षा असताना फार वाढविली जात नाही. त्यामुळे पुलाच्या उभारणीबद्दल संभ्रम व्यक्त होत आहे.
Sanjay Shirsat: “तुमच्या जहाजातले उंदीर…”; संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
राज्यात बॅरिस्टर अंतुले हे मुख्यमंत्री असताना उल्हासनदीवर दहिवली मालेगाव येथे पुलाची उभारणी करण्यात आली होती. कालातंराने पुलाची उंची आणि उल्हास नदीला येणारा पूर यामुळे अडचणीची ठरू लागली आहे.अनेक वर्षे पावसाळयात या पुलावरून उल्हासनदीला पूर आल्यानंतर पुलावरून पाणी जाण्याच्या घटना घडत असतात. त्याचा परिणाम पुलावरून पलीकडील गावात होणारी वाहतूक बंद होत असे. त्यामुळे सातत्याने 2010 पासून या ठिकाणी नवीन आणि अधिक उंचीचा पूल बांधण्यात यावा अशी मागणी होत होती.
2024 मध्ये नवीन पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून 2025 मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर सध्या पुलाच्या डावीकडील बाजूस नवीन पूल बांधणायचे काम सुरु झाले असून अनेक ठिकाणी पुलाचे पिलर उभे राहिले आहेत. मात्र पुलाच्या कामाची गती लक्षात घेता यावर्षी पावसाळ्याआधी पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.
Mansson Update: पहिल्याच पावसात बहरलं माथेरान ;निळ्याशार आकाशात रंगीबेरंगी उधळण
परंतु सध्या सुरु असलेल्या पुलाचे पिलर लक्षात घेतले असता पुलाच्या उंची बद्दल स्थानिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. पावसाळयात पुलावरून महापूर आल्यावर पाणी जाऊ लागते आणि त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद होते. यावर उपाय म्हणून अधिक उंची असलेला नवीन पूल बांधला जात असून पुलाची उंची सध्याच्या पुलाच्या किंना दहा फूट अधिक असेल अशी अपेक्षा होती. त्या ठिकाणी पुलाचे बांधकामासाठी बांधकाऱ्यांत आलेले पिलर यांची उंची पाहिली असता ती पूर्वीच्या पुलाच्या जेमतेम दोन फूट अधिक आहे. त्यामुळे पुढील वर्षी देखील नवीन झालेल्या पुलावरून पाणी जाणार आहे. ही बाब सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्षात ठेवण्याची आवश्यकता असून नवीन पुलाची उंची अधिक ठेवण्यासाठी आताच प्रयत्न सुरु करावेत अशी मागणी जय मल्हार रिक्षा संघटनेचे सदस्य रिक्षाचालक दहिवली गावातील ग्रामस्थ अनिल मते यांनी केली आहे.