संजय शिरसाट यांचे निवडणुकीवर भाष्य (फोटो सोशल मिडिया)
बुलढाणा: महायुतीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचे पुस्तक प्रकाशन, भाजप आणि अन्य विषयांवर भाष्य केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवण्याची चाचणी सुरू आहे . बुलढाणा येथून मंत्री संजय शिरसाट नेमके काय बोलले आहेत, ते जाणून घेऊयात.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले, “आगामी कालावधीत येणारया निवडणुकांची तयारी सुरू आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचणी सुरू आहे. फक्त भाजपच नाही तर प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढण्याची तयारी करत असतो. त्यामुळे भाजपने काही वेगळे केले असे म्हणत येणार नाही. आम्हीसुद्धा स्वबळावर लढणार आहोत. तयारी करत आहोत. परंतु येणाऱ्या सर्व निवडणुका या महायुतीमध्ये लढायच्या आहेत असे आदेश आहेत.”
पुढे बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले, “एखाद्या ठिकाणी जर चुकून तणाव झाला तर त्या ठिकाणी कदाचित वेगवेगळे लढावं लागणार आहे. स्वतः दगा करायचा आणि दुसऱ्यांवर आरोप करायचा ही त्यांची जुनी सवय आहे. टोमणे मारणे आणि आरोप करणे यामध्येच त्यांचा पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ निघून गेला आहे.”
“आमचेच नाही तर भाजपाचे ओव्हरलोड झालेले जहाज हे लवकरच बुडणार असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र आमच्या जहाजामध्ये मध्ये निदान भरती तरी होते. तुमच्या जहाजातले उंदीर पळून चालले आहेत , त्याकडे लक्ष द्यावे”, अशी टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
“जित्याची खोड मेल्याशिवाय जात…”; खासदार संजय राऊतांवर शिंदे गटाच्या नेत्याचा जोरदार प्रहार
उद्धव ठाकरे म्हणतात की देशावर जर संकट आलं तर आम्ही पंतप्रधानांसोबत राहू. जेव्हा संकट आलं तेव्हा तुम्ही खंबीरपणे उभे राहिले पाहिजे होते. मात्र तुम्हाला वाटलं की आता जर पाकिस्तानच्या विरोधात बोललो तर आपल्या मतावर परिणाम होईल. तुम्ही जी मतांची बेरीज करण्याचा प्रयत्न करत आहात त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल.”
खासदार संजय राऊतांवर शिंदे गटाच्या नेत्याचा जोरदार प्रहार
खासदार संजय राऊत यांचे नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे अद्याप प्रकाशन झालेले नाही. मात्र त्यापूर्वीच या पुस्तकातील गोष्टींवरुन वाद निर्माण झाला आहे. खासदार राऊत यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये अमित शाह यांनी त्यांच्या परिवाराला बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवले आहे असा दावा केला आहे. तसेच अनेक मुद्द्यांवरुन हे पुस्तक प्रकाशन सोहळ्यापूर्वी चर्चेत आले आहे. यानंतर आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.