एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले (फोटो- टीम नवराष्ट्र)
Aditya Thackeray Meet Devendra Fadnavis: 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची 25 वर्षांची युती तुटली. मुख्यमंत्रीपदाबाबत एकमत न झाल्याने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवागी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तास्थानी आली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होऊनही महाराष्ट्राच्या राजकारणात कुजबुज पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना शपथ घेऊन ३५ दिवस झाले आहेत. याचदरम्यान चर्चा होते ती म्हणजे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट… शिवसेना उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची आतापर्यंत तीनवेळा भेट घेतली. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा भेट घेतली आहे. वरळी मतदारसंघातील विविध विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याचे समजते आहे. मात्र याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणारे, घटनाबाह्य सरकार म्हणणारे तसेच एक तर तू राहशील किंवा मी राहीन अशी टोकाची भूमिका घेणारे इतक्या लवकर आपले रंग बदलतील असे वाटले नव्हते.”
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ” सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची जात मी पहिल्यांदा बघितली. ज्यांनी लोकांना दूर केले, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा केली त्यांना जनतेने जागा दाखवून दिली आहे. राज्याच्या जनतेने महाविकास आघाडील संस्कार, संस्कृति शिकवली आहे. आधी ते शिव्या, शापाशिवाय काही बोलत नव्हते. पहिले सरकार आले तेव्हा टीका करण्याशिवाय काही केले नाही. मात्र आम्ही आरोपाना कामातून उत्तर दिले आहे.”
हेही वाचा: Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राज्यात मोठे भगदाड
ठाकरे फडणवीस एकतर येणार?
विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर थेट टीका केली होती. एकतर तू राहशील, नाहीतर मी राहीन. ठाकरे यांनी फडणवीसांना आव्हान दिले होते. पण ठाकरेंना होणारा विरोधही कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.एकंदरित या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
शिवसेना फूटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अजूनही थांबताना दिसत नाहीये. कारण राज्याच्या विविध भागातील ठाकरेंच्या पदाधीकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. ठाण्याच्या आनंद आश्रमात ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवनेतील गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ठाणे, भिवंडी, शहापूर, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.