सिंधुदुर्ग: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar In Shinde Group) शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याविषयी दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे राहिलेले थापा जर आमच्यासोबत आले आहेत. याचा अर्थ बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलेले त्यांच्या जवळच्या माणसांना कोणालाही आवडलेले नाही. मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख न करता बाळासाहेबांशी एकनिष्ठ राहिलेले सगळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील, असे सूतोवाच केसरकर यांनी दिला. दसरा मेळाव्यात विचारांचे सोनं लुटले जाईल याची खात्री मी देतो, असंही ते म्हणाले.
[read_also content=”शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका, काँग्रेस आमदाराचा दावा https://www.navarashtra.com/maharashtra/congress-mla-kailash-gorantyal-reply-abdul-sattar-331736.html”]
तसेच राजकारण बाजूला ठेवत कोकणाचा कसा विकास करावा यासंदर्भात बॅरिस्टर नाथ पै यांचे व्हिजन होते. राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपण आपल्या भागाचा विकास केला पाहिजे बाहेरील कोणी व्यक्ती येऊन आपल्या भागाचा विकास करेल, अशी अपेक्षा बाळगू शकत नाही.
मिलिंद नार्वेकर शिंदे गटामध्ये सामील होतील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. शिवसेना आमचीच आहे. धनुष्यबाणाचं चिन्ह आमच्याकडे आल्यावर उरलेले आमदारही शिंदे गटामध्ये येतील, असं त्यांनी म्हटलं आहे.