पुणे – राज्यातील कुस्तीपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनात तिपटीहून अधिक वाढ करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मानधन वाढवण्यासोबत कुस्तीपटूंना सरकारी नोकरीही दिली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुण्यात महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होण्यापूर्वी देवेंद्र फडणीसांनी ही महत्त्वाची घोषणा केली.
राज्यातील कुस्तीपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनात तिपटीहून अधिक वाढ करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होण्यापूर्वी देवेंद्र फडणीसांनी ही महत्त्वाची घोषणा केली. फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील जे खेळाडू ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धेत खेळले आहेत, त्यांना आतापर्यंत केवळ 6 हजार रुपये मासिक मानधन दिले जात होते. आता यात वाढ करुन 20 हजार रुपये दिले जातील. याशिवाय हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तुमे हिंद स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंचे मानधन 4 हजार रुपयांवरुन 15 हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच, अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे मानधन 6 हजार रुपयांवरुन 20 हजार रुपये करण्यात आले आहे.
निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कुस्तीपटू प्रचंड मेहनत घेत असतात. त्याचप्रमाणे त्यांना खुराकही आवश्यक असतो. सामान्य घरांमधून तरुण मेहनतीने कुस्तीपटू होतात. आतापर्यंत त्यांना अतिशय तुटपूंजे मानधन दिले जात होते. त्यात त्यांचा खर्च भागणे शक्यच नव्हते. त्यामुळेच सरकारने कुस्तीपटूंच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीपटूंना कोणतीही अडचण येऊ नये, त्यांना विविध स्पर्धांसाठी प्रोत्साहन देणे, हे यापुढे सरकारचे धोरण असेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.