मुंबई : दीड-दोन महिन्यांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला. त्यानंतर रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प राज्याबाहेर गेला. मागील आठवड्यात टाटा एअरबसचा विमान निर्मितीचा प्रकल्प (Tata Airbus Project) सुद्धा राज्याबाहेर गेला. त्यानंतर आता राज्यात होणारा सॅफ्रन प्रकल्प (Saffron Project) देखील राज्याबाहेर गेला आहे. त्यामुळं विरोधक आक्रमक झाले असून, विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्रातील उद्योग धंदे बाहेरच्या राज्यात पाठवत आहेत. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्रद्रोही असल्याची टिका विरोधकांनी केली आहे. याविरोधात संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत असताना, सॅफ्रन प्रकल्प (Saffron Project) राज्याबाहेर गेल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत मविआ सरकारमुळं हे सर्व प्रकल्प राज्याबाहेर गेले असा आरोप केला. त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत शिंदे-फडणवीस सरकारवर तसेच देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.
[read_also content=”राजगर्जना धडाडणार… २७ नोव्हेंबरला मुंबईत मनसेचा मेळावा https://www.navarashtra.com/maharashtra/mns-melava-in-mumbai-on-twenty-seven-november-340675.html”]
वेदांता व फॉक्सकॉन हे वेगवेगळे प्रकल्प
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची दिशाभूल करताहेत, त्यांनी सांगितलेल्या वेदांता प्रकल्प वेगळा आहे. वेदांता व फॉक्सकॉन हे वेगवेगळे दोन प्रकल्प आहेत. आकड्यांचा खेळ खेळण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, मागच्या सरकारच काम पुढील सरकार करत असतं, पण हे कुरघोडी व आरोप करत आहेत. वेदांताबाबत 24 फेब्रुवारी 2022 ला जागेची भेट देण्यात आली होती. 6 मे 2022 रोजी वेदांता कंपनीनं महाराष्ट्रात जागेला भेट दिली. आणि जून 2022 मध्ये अधिकाऱ्यांनी पत्र दिलं आहे. वेदांता प्रकल्प सेमीकंडक्टरसाठी होता.
…मग मुख्यमंत्री कोणाला भेटले?
जर प्रकल्प आमच्या काळात गेला म्हणता, मग शिंदे सरकार कुणाच्या काळात जाऊन अधिकाऱ्यांना भेटले. 15 जुलै 2022 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वेदांताला पत्र लिहिलं आहे. ते पत्र आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दाखवले. यावेळी पावसाळी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेदांताच्या अधिकाऱ्यांना भेटले असा दावा केला. जर प्रकल्प आमच्या काळात गेला म्हणता, मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाला जाऊन भेटले? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
इलेक्ट्रॉनिक हब प्रकल्प वेदांतापेक्षा लहान
दरम्यान, रायगडमधील बल्क ड्रग पार्कसाठी राज्यातून प्रस्ताव गेला होता, प्रस्ताव गेल्याच नाही म्हणणं हे खोटं आहे. राज्याबाहेर गेलेला प्रकल्प मोबाईल संबधित आहे. वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात येणार असं मुख्यमंत्री म्हणाले होते, ते फक्त गाजर दाखवलं. राज्यात प्रकल्प रोखण्यासाठी डबल इंजिन सरकार का फेल गेलं. असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. आज आमचं सरकार असतं तर राज्यात बल्क ड्रग प्रकल्प असता. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक हब हा प्रकल्प वेदांतापेक्षा लहान असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
फडणवीस आणि शिंदेंना आव्हान
राज्यात उद्योगधंद्यासाठी वातावरण चांगल नाही, असं टाटांचे कोणते अधिकारी म्हणाले? त्या अधिकाऱ्यांची नावे सांगा असं आदित्य ठाकरेंनी यावेळी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं. महाराष्ट्र मागे गेला असं म्हणता मग दाखवून द्या, दरम्यान, प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यासोबत एकाच व्यासपीठावर चर्चा करण्यास मी तयार आहे, असं आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील आव्हान यावेळी दिले. तसेच राजकीय कार्यकर्त्यांसाठी समृद्धी महामार्ग खुला मग सामान्य जनतेसाठा का नाही? असा सवाल ठाकरेंनी यावेळी विचारला.