नसरापूर-वेळू गटात राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या; आमदार शंकर मांडेकर यांचं आवाहन
भोर : आमदारांबरोबर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य एकाच विचाराचे असतील तर विकासाला गती मिळते. दिवंगत नेते अजितदादांच्या पाठिंब्याने दीड वर्षात साडेतीन ते पावणेचार हजार कोटींची कामे झाली आहेत. यापुढेही आपल्या विकासाची गती वाढवायची असेल तर नसरापूर-वेळू गट व गणातील गणेश खुटवड, विशाल कोंडे, अशोक वाडकर या तिन्ही उमेदवारांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी आवाहन केले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नसरापूर (ता. भोर) येथील नसरापूर वेळू गटाच्या प्रचार सभेत मांडेकर बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, बाळकृष्ण दळवी, गणेश बागल, कविता खोपडे, जिल्हा परिषद उमेदवार गणेश खुटवड, पंचायत समिती उमेदवार विशाल कोंडे, अशोक वाडकर, नसरापूरच्या सरपंच उषा कदम, माजी उपसरपंच संदिप कदम, नामदेव चव्हाण, यशवंत कदम, अझम तांबोळी, सचिन परदेशी, समिर राऊत, निलेश कोंढाळकर, मोहन इंदलकर, पोपट चौधरी, सागर राशिनकर, धनंजय शेटे, मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भालचंद्र जगताप यांनी बोलताना अजितदादांच्या प्रयत्नाने आमदार मांडेकर यांच्या माध्यामातून येथील विकासाला गती मिळाली आहे. ही गती आपल्याला अजितदादांच्या प्रेरणेने व विचाराने अशीच पुढे चालू ठेवायची आहे. त्यासाठी राष्ट्रवादीला साथ देण्याचे आवाहन केले.
विक्रम खुटवड यांनी बोलताना येथील तीनही उमेदवार तरुण तडफदार असून, कामचे आहेत. माझ्या मतदारसंघातील तीन गावे या गटास जोडली गेली आहेत. त्या ठिकाणचे मतदार राष्ट्रवादी व नामदार काशिनाथराव खुटवड यांना मानणारे आहेत. तेथील मतदान राष्ट्रवादीच्या घड्याळाच होईल, अशी मी ग्वाही देतो. गणेश बागल यांनी या गटात सन 2012 पुर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती तीच सत्ता आपल्याला परत आणायची आहे. राष्ट्रवादीचे तीनही उमेदवार नव्या उमेदीचे आहेत. त्यांना साथ देऊन विकासात मागे गेलेला हा भाग पुन्हा प्रगतीपथावर आणावयाचा आहे, असे सांगितले.






