फोटो सौजन्य - सोशल मीडिया
शिर्डी : शिर्डीच्या साईबाबांचे भक्त फक्त राज्यामध्ये नाही तर देशभरामध्ये आहे. एवढेच नाही तर परदेशातून देखील त्यांचे भक्त दर्शनासाठी येत असतात. अनेक भक्त साईचरणी सोने अर्पण करत असतात. तर अनेक भक्त रोख रक्कम स्वरुपात देणगी देतात. सध्या शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या सुवर्ण मुकुटाची चर्चा आहे.
शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी एका भक्ताने सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. या सुवर्ण मुकुटांची किंमत तब्बल 42 लाख 80 हजार रुपये आहे. हा साईचरणी अर्पण करण्यात आलेला मुकुट 648 ग्रॅम वजनाचा आहे. साई बाबांच्या भक्ताने अर्पण केलेला हा मुकुट अतिशय सुंदर व सुबक आहे. मुकाटामध्ये नक्षीदार कलाकारी करण्यात आली आहे. याबाबत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अधिकची माहिती दिली आहे.
संस्थानाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुकुट अतिशय सुबक आहे. मात्र अर्पण करणाऱ्या भक्ताने नाव जाहीर न करण्याचे आवाहन केले आहे. साई बाबांच्या आरतीवेळी अनेक भक्त देणगी देतात. या भक्ताने आरतीवेळी सुवर्ण सुबक नक्षीदार असा मुकुट साईचरणी अर्पण केला. तसेच भक्ताचे नाव देखील गुप्त ठेवण्यात आले आहे.