File Photo : Dhangar Reservation
मुंबई : मराठा आरक्षणाची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. त्यातच आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा वाद पेटल्याचे दिसत आहे. धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण हवे आहे. मात्र, त्याला आदिवासी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे दोन्ही समाज आमनेसामने आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता धनगर आरक्षणासाठी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.
हेदेखील वाचा : आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; पंढपुरात उपोषणकर्त्याचा विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. काही आमदार आणि नेते सातत्याने आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत. आंदोलन करत आहेत. मुंबईला येणारे पाणी अडवण्याची भूमिका आता त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आताच ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. राजकीय हेतूने प्रेरित होऊन जर कुणी राजकारण करत असेल तर ‘अभी नही तो कभी नहीं’, असा इशारा देतानाच राज्यात सोमवारी सकाळी अकरा वाजता मोठा रास्ता रोको करा, असे आवाहनच आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
पंढरपूर, लातूरमध्ये उपोषण उपवर्गीकरण करण्यास मान्यता दिली पण सरकार वेळ काढूपण करत असेल तर ही गंभीर बाब आहे. जीआरबाबत सरकारने भूमिका घेतली पाहिजे, असे सांगतानाच पंढरपूर आणि लातूरमध्ये आमची उपोषणे सुरू आहेत. आता ता आम्ही सोमवारी रास्ता रोको करणार आहोत. शांततेच्या मार्गानेच रास्ता रोको करणार आहोत, असे पडळकर म्हणाले.
ऐन विधानसभेत सरकारची कोंडी होणार?
दोन्ही समाजाकडून सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा वाद पेटल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यातच आता धनगर समाजाचे नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणासाठी दंड थोपटले आहेत. पडळकर यांनी सोमवारी राज्यव्यापी रास्तारोको करण्याचे जाहीर केले आहे.
हेदेखील वाचा : आता धनगर समाज ‘या’ मागण्यांसाठी करणार आंदोलन; पंढरपुरात पार पडली बैठक






