Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: धाराशिवमध्ये उपसा सिंचन योजना क्र. २ अंतिम टप्प्यात; १०,८६२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

धाराशिव जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना क्र. २ अंतिम टप्प्यात असून, भूसंपादनातील अडथळे दूर करून कामांना गती देण्यात आली आहे. १०,८६२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 08, 2026 | 12:09 PM
धाराशिवमध्ये उपसा सिंचन योजना क्र. २ अंतिम टप्प्यात; १०,८६२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

धाराशिवमध्ये उपसा सिंचन योजना क्र. २ अंतिम टप्प्यात; १०,८६२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

Follow Us
Follow Us:

धाराशिव जिल्ह्यातील सिंचनासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेली उपसा सिंचन योजना क्र. २ सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून, भूसंपादन प्रक्रियेत येणारे अडथळे पोलीस बंदोबस्तात दूर करून कामांना गती देण्यात आली आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यातील तुळजापूर, लोहारा व उमरगा तालुक्यातील एकूण १०,८६२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी २.२४ अब्ज घनफूट पाण्याचा वापर करण्यात येणार असून, सीना नदीवरील घाटणे बॅरेज येथून सहा टप्प्यांद्वारे पाणी उपसा करून विविध प्रकल्पांमध्ये साठवण करण्यात येणार आहे. तुळजापूर तालुक्यातील रामदारा तलावात पाणी साठवून सिंचनासह पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

ST Bus Fare Hike : उन्हाळ्यात एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, तिकीट दरांत 10 टक्के हंगामी भाडेवाढ

कामांची सद्यस्थिती

योजनेतील टप्पा क्रमांक १ ते ५ मधील बहुतांश कामे अंतिम टप्प्यात आहेत.
टप्पा क्र. २ (पडसाळी), टप्पा क्र. ३ (सावरगाव) आणि टप्पा क्र. ५ (सिंदफळ) येथील स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत.

टप्पा क्र. ४ (पांगरदरवाडी) येथील काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.
टप्पा क्र. १ (भोयरे) येथील पंपगृहाचे काम सध्या ७५ टक्के पूर्ण झाले असून, पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

अतिवृष्टीचा परिणाम

२०२५ मधील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला पूर आला होता. त्यामुळे भोयरे येथील पंपगृहात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने काम काही काळ मंदावले होते. सध्या तेथील काम पुन्हा वेगाने सुरू आहे.

भूसंपादनातील अडथळे

थेट खरेदीद्वारे भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध, मोबदल्याबाबत असमाधान, उच्च न्यायालयात दाखल याचिका तसेच संबंधित गटांतील वाद यामुळे कामात अडथळे निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हे अडथळे दूर करून कामे सुरू ठेवली आहेत.

कालवा व नलिका कामे

एकूण ४०.९६ कि.मी. कालव्यापैकी केवळ ५५० मीटर काम शिल्लक आहे.
तसेच १५.३० कि.मी. उर्ध्वगामी नलिकेपैकी केवळ ७०० मीटर काम बाकी आहे.

दुष्काळी भागासाठी दिलासा

ही योजना पूर्ण झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळणार असून, सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचीही उपलब्धता वाढणार आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

डोंबिवली पश्चिमेलाही नव्याने होणार दुय्यम निबंधक कार्यालय, आमदार रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा

Web Title: Dharashiv lift irrigation scheme phase 2 final stage benefit 10862 hectares

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • agricultural
  • Dharashiv
  • Water Issue

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा
1

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…
2

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
3

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती
4

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.