55 ठिकाणी स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची गरज
धुळे: पेन हा शालेय जीवनाचा अविभाज्य भाग आहे मात्र हाच पेन विद्यार्थ्याीनीच्या आयुष्याचा काळ ठरला आहे. पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. शाळेत पेनाचं टोपण गिळल्याने या चिमुकलीचा प्राण गेल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. धुळे तालुक्यातील निमखेडी जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. पेनाचे टोपण श्वसनलिकेत अडकल्याने अर्चना खैरनार या सात वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्चना खैरनार हिने गिळलेले पेनाचे टोपण काढण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला. तर त्यांना त्यात यश आले नाही. अखेर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अर्चना खैरनार हिला मृत घोषित केले. अर्चना खैरनार या सात वर्षीय विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे निमखेडी गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
चाकण वाहतूक विभागाला लागली लॉटरी; नियमांचे उल्लंघन वाहनचालकांकडून लाखोंची दंड वसूली
इयत्ता पहिलीत शिकणारी चिमुकलीचं नाव अर्चना युवराज खैरनार असं आहे. जिल्हा परिषद शाळा, निमखेडी गावात ही चिमुरडी शिकत होती. शाळेत अभ्यास करताना तिने पेनाचं टोपण तोंडात टाकलं. हे टोपण तिच्य़ा श्वसननलिकेत अडकलं. त्यामुळे अर्चनाला श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागला. शाळेतील शिक्षकांनी पेनाचं टोपण बाहेर काढण्यासाठी शर्थीच् प्रयत्न केले. मात्र टोपण काही केल्या निघालं नाही. त्यानंतर शिक्षकांनी तिच्या घरच्यांना बोलावून रुग्णालयात दाखल केलं. मात्र मात्र उपचार सुरू असताना तिचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली. त्यासगळ्य़ा धक्कादायक प्रकाराने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. lत्यामुळे पालकांनो कृपया तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. असं शासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. शाळेतील शिक्षकांनी देखील आपल्या विद्यार्थ्य़ांकडे लक्ष द्यावं तसंच पुालकांनी ही मुलांच्या शाळेतच्या बॅगेत टोकटार वस्तू किंवा जीवावर बेतेल अशा शाळेय साहित्यापासून शक्यतो मुलांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
अहिल्यानगर शहर बस सेवेचे वाजले तीनतेरा; नगरकरांच्या जीवाशी रोजच खेळ
या घडलेल्या सगळ्या प्रकरणावर जिल्हा परिषद शालेचे मुख्याध्यापकांनी यावर प्रतिक्रिया दिलाी आहे. मुख्याध्यापक सुहास जैन म्हणाले की, शाळेतील हा प्रकार घडला तेव्हा वर्गशिक्षकांनी तिच्या घशातील टोेपण काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शिक्षकांचे प्रयत्न अशस्वी ठरले. त्यानंतर अर्चनाला रुग्णालयात दाखळ करण्यात आलं, असं त्यांनी सांगितलं आहे. मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी पालक आणि शिक्षक यांच्यावर प्रामुख्याने असते. त्यामुळे आपल्या पाल्याच्या आणि विद्यार्थ्याच्या शालेय वस्तूंची तपासणी करावी. अशा आशयाच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर नोंदवला आहे.