काय घडलं नेमकं?
ट्रक मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जात होता. त्यावेळी महामार्गावरून जात असतांना समोर असलेल्या एका वाहनाला ट्रकची जोरात धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की ट्रकला अचानक आग लागली. क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
ट्रकला लागलेली आग इतकी वेगाने पसरली की, चालक केबिनमध्ये अडकला चालकाला बाहेर निघण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. याआगीत ट्रकचा क्लिनर बाहेर निघाला, मात्र तो देखील या आगीत गंभीररीत्या भाजला. त्याच्यावर जवळच्या रुग्णलयात उपचार सुरु आहेत.
दुर्दैवी! धावून मिळवला पदक, पण वाचला नाही जीव; शालेय मॅरेथॉननंतर १३ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
पालघर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लोकभारती संस्थेच्या भरती अकादमी इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विद्यार्थिनीने मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर काही क्षणातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तिने क्रीडा स्पर्धेत तिसरा पदक पटकावला मात्र क्षणाधार्त आयुष्य संपवल्याने शाळा, पालक आणि शिक्षक शोकसागरात बुडाले आहेत.
काय घडलं नेमकं ?
मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव रोशनी रमेश गोस्वामी (वय १५) असे आहे. ती इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाली होती. तिने मोठ्या उत्साहात आणि आत्मविश्वासाने ही शर्यत पूर्ण करत तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धा संपल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होते. मात्र, काही वेळानंतर रोशनीला अस्वस्थ वाटू लागले.
तिला चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अश्या तक्रारी जाणवू लागल्या. त्यानंतर अचानक तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच शाळेतील शिक्षक व क्रीडा स्पर्धेचे आयोजकांनी तातडीने रोशनीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. तिला गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी रोशनीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तिच्या अकाली निधनाने उपस्थित सर्वानाच मोठा धक्का बसला.
Nandurbar News: नंदुरबारमध्ये 21 दिवसांपासून बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला शेतात; घातपाताचा संशय
Ans: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर, पालघरजवळ.
Ans: ट्रकने समोरील वाहनाला जोरात धडक दिल्यानंतर आग लागली.
Ans: चालकाचा मृत्यू झाला; क्लिनर गंभीर जखमी आहे.






