Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन; निलेश लंकेंच्या समर्थकांचा इशारा कुणाला?

अहमदनगर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यात इंग्रजी बोलण्याच्या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 29, 2024 | 04:04 PM
Photo Credit - Team Navrashtra

Photo Credit - Team Navrashtra

Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर :  अहमदनगर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यात इंग्रजी बोलण्याच्या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगला होता. लोकसभा निवडणुकीत विखे पाटलांच्या साम्राज्याला धक्का देत निलेश लंके अहमदनगरचे खासदार म्हणून निवडूनही आले.विशेष म्हणजे निलेश लंके यांनी विजयानंतर थेट इंग्रजीतून शपथ घेतली आणि सुजय विखेंना चोख उत्तरही दिले.

यानंतर आता नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी इंग्रजीमधून बॅनरबाजी करत पुन्हा एकदा सुजय विखेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.  निलेश लंके यांच्या समर्थक अर्जुन भालेकर यांनी पारनेर मध्ये चक्क इंग्रजी भाषेतून बॅनरबाजी  केली आहे. “डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन’ (Don’t Underestimate the Power of Common Man)  असा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आला आहे. हे बॅनर सध्या संपूर्ण अहमदनगरमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. तर सुजय विखेंना हे चोख प्रत्युत्तर आहे अशी चर्चाही अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांनी ‘रील पेक्षा रियलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचे असल्याचे म्हटले होते. तसेच, सुजय विखेंचा एक व्हिडीओ दाखवत, काही जण रिल्स बनवू काम केल्याचा दिखावा करतात, असा टोलाही लगावला होता. जगताप यांनी दाखवलेल्या काही व्हिडीओमध्ये विखे पाटील यांच्या संसदेतील इंग्रजी भाषणांचांही समावेश होता.

याच इंग्रजी भाषणांचा धागा पकडून सुजय विखेंनी, ‘मी जेवढे इंग्रजी बोललो तेवढे समोरच्या उमेदवाराने किमान पाठ करून सभेत बोलून दाखवावे. तसे झाले तर मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही.’ असे आव्हान दिले होते. पण निलेश लंके यांनी हे आव्हान स्वीकारले आणि संसदेत इंग्रजी भाषेतून शपथ घेतली.

 

Web Title: Dont underestimate the power of common man who is the warning of the supporters of nilesh lanke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 04:02 PM

Topics:  

  • ahmednagar
  • BJP
  • Maharashtra Political News
  • Nationalist Congress Party
  • Nilesh Lanke
  • political news
  • Sujay Vikhe-Patil

संबंधित बातम्या

तमिळनाडूमध्ये राजकीय वारसा अजूनही सुरुच; एम. जी. रामचंद्रन यांच्या नावाचा 40 वर्षांनंतरही वापर
1

तमिळनाडूमध्ये राजकीय वारसा अजूनही सुरुच; एम. जी. रामचंद्रन यांच्या नावाचा 40 वर्षांनंतरही वापर

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil : सुजय विखेंना उच्च न्यायालयाचा धक्का; निलेश लंकेंची खासदारकी कायम, निवडणूक याचिका फेटाळली
2

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil : सुजय विखेंना उच्च न्यायालयाचा धक्का; निलेश लंकेंची खासदारकी कायम, निवडणूक याचिका फेटाळली

Kharge Apologizes to Gujarati : आधी गुजरात्यांना म्हटले ‘बेवकुफ’ अन् नंतर मागितली माफी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चर्चेत
3

Kharge Apologizes to Gujarati : आधी गुजरात्यांना म्हटले ‘बेवकुफ’ अन् नंतर मागितली माफी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चर्चेत

“महाराष्ट्रात 50 लाख बांगलादेशी घुसखोर मतदार”; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा, SIR मोहिमेची मागणी
4

“महाराष्ट्रात 50 लाख बांगलादेशी घुसखोर मतदार”; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा, SIR मोहिमेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.