औरंगाबाद : महाराष्ट्रात येणारा वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या राज्यात बरेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. तसेच राज्य सरकारच्या (State government) नाकर्तेपणामुळं हा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये (Gujrat) गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडले जात आहे. (Shinde fadnvis government) दरम्यान, यावरुन विरोधक आक्रमक होत सरकारवर हल्लाबोल करत असताना, आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत, ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.
[read_also content=”राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १९ सप्टेंबरला सोलापूर व विदर्भ दौऱ्यावर https://www.navarashtra.com/maharashtra/ncp-chief-sharad-pawar-tour-to-vidharbha-and-solapur-325848.html”]
दरम्यान, मविआने राज्यात नवनवीन प्रकल्प आणण्याचे प्रयत्न केले, वेदांता कंपनीनं तळेगावमध्ये जागेची पाहणी सुद्धा केली होती, जागा सुद्धा निश्चित झाली होती. वेदांता कंपनीसाठी महाराष्ट्रातील वातावरण पोषक होते. मोठी गुंतवणूक राज्यातून जाऊ नये असं मला वाटतंय. कोरोनानंतर राज्यात अनेक चायना प्रकल्प येणार होते असं सुद्धा अजित पवार म्हणाले. वेदांता कंपनीसाठी महाराष्ट्रातील वातावरण पोषक होते. मात्र अचानक असे काय झाले आणि ही कंपनी गुजरातमध्ये गेली हे सरकारचे अपयश असून, राजकीय दबावापोटी वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.