जालना : एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात चलबिचल सुरू असताना तिकडे शिवसेना नेते ईडीच्या रडारवर असताना दिसत आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी ( Arjun Khotkar) शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारलाय. रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जमीन, कारखाना इमारत आणि मशीन अशी एकूण ७८ कोटीचा मालमत्ता ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे.
ईडीकडून ज्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली, तो जालना सहकारी साखर कारखाना मे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीज या कंपनीच्या मालकीचा आहे. या कारखान्याच्या लिलावात आणि विक्रीवेळी कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. थकलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी या कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. हा कारखाना अवघ्या 42 कोटी 31 लाख रुपयांना विकण्यात आला. मात्र त्यानंतर ईडीने स्वतंत्रपणे या मालमत्तेचे सर्वेक्षण केल्यानंतर या कारखान्याच्या मालमत्तेची एकूण किंमत 78 कोटींपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. आता या प्रकरणात ईडीच्या वतीने अर्जुन खोतकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
[read_also content=”‘भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वत:ला महाशक्ती म्हणून मिरवतेय’, सामनातून शिवसेनेची भाजपवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-criticized-on-bjp-over-maharashtra-politics-from-saamna-nrps-296729.html”]
दरम्यान या कारवाईबाबत बोलताना खोतकर यांनी म्हटले आहे की, ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांनी साखर कारखान्याची संपत्ती जप्त केली आहे. याविरोधात आपण कोर्टात दाद मागणार आहोत. हा लढा कायदेशीर मार्गाने लढणार आहोत. सध्या राजाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ईडी आणि सीबीआयच्या भीतीने आमदारांनी पळ काढल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता अर्जुन खोतकर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.
[read_also content=”२००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड गजाआड https://www.navarashtra.com/world/the-mastermind-of-2008-mumbai-terror-attacks-is-arrest-in-pakistan-nrgm-296733.html”]