file photo
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) हे आज समृद्धी महामार्गाची(Samriddhi Highway) पाहणी करणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता नागपुरातील झिरो माईलपासून त्यांच्या पाहणी दौऱयाला सुरुवात होणार असून सायंकाळी 5 च्या सुमारास त्यांचा दौरा शिर्डीत संपणार आहे.
[read_also content=”https://www.navarashtra.com/maharashtra/a-boy-married-two-girls-at-a-time-in-solapur-akaluj-nrps-350694.html चर्चा तर होणारच! अकलुजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी बांधली लग्नगाठ”]
बहुप्रतिक्षीत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच काम पुर्ण झालं आहे. 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपुर शिर्डी समृध्दी माहामार्गाच्या उद्धघाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. तर शिंदे-फडणवीस उद्या प्रत्यक्ष महामार्गावर प्रवास करून पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी नागपूरला आगमन होणार आहे.