Photo : Encroachment
कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायत व पोलिसांनी गुरुवारी (दि.20) सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण कारवाई राबवली. सलग तिसऱ्या वेळी राबविलेल्या अतिक्रम हटाव मोहिमेत सुमारे 20 अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यात बहुतांश अतिक्रमणे ही अतिक्रमणधारकांनी स्वतः काढून घेतली.
हेदेखील वाचा : गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल 54 लाखांची फसवणूक; पॉलिटेक्निक प्राध्यापकासह 6 जणांविरुद्ध गुन्हा
मागील अडीच महिन्यांपासून शहरातील वाहतूक कोंडी व त्यातून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक व कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी संयुक्तपणे शहरातून जाणाऱ्या सातारा ते लातूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेली अतिक्रमण हटविण्याची मोहीम उघडली होती. प्रथम त्यांनी रस्त्याकडेला अस्ताव्यस्त व वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारी फेरीवाले, फळे, भाजीपाला, इतर छोटे मोठे साहित्य विक्रेते, दुकानदारांनी आपापल्या दुकानाच्या समोर जाहिरात फलक, पत्र्याचे छत आदी माध्यमातून केलेली कच्ची अतिक्रमणे हटवली.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 96 पक्क्या अतिक्रमणधारकांना रीतसर नोटीसा काढून त्यांना अतिक्रमणे काढून घेण्याचे सूचित केले. मात्र, त्यास फार प्रतिसाद न मिळाल्यामुळे मोठ्या पोलीस बंदोबस्तात दुसऱ्या वेळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण हटवण्यात आली. त्यात काहींनी लवकरच आम्ही अतिक्रमण काढून घेतो, असे लेखी दिले होते.
दरम्यान, या दुसऱ्या अतिक्रमण मोहिमेनंतर सायंकाळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन मोहीम राबविण्याची मागणी केली होती. त्यानुसार, या मोहिमेस स्थगिती देण्यात आल्याने शहरात पुन्हा अतिक्रमणे ‘जैसे थे’ स्थितीत असल्याचे समोर आले.
शिरूरमध्ये अतिक्रमणवर कारवाई
दुसरीकडे, सणसवाडी (ता.शिरुर) येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर दैनंदिन व औद्योगिक वाहतूकीमुळे दररोज वाहतूक कोंडी चौकात पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अतिक्रमण विरोधी कारवाई पथकाने बुधवारी (दि.१२) दिवसभरात तब्बल १०५ बेकायदा गाळे व टपऱ्या सपाट केल्याने भाजी विक्रेते, वडापाव, चायनिज, स्वीटहोम या गाळ्यांनी महामार्गावरील चौक व्यापला गेला असताना हे सर्व मोकळे केल्याने सणसवाडीतील महामार्ग कालपासून मोकळा श्वास घेवू लागला आहे.
हेदेखील वाचा : Eknath Shinde death Threat: एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, बुलढाण्यातून मामा भाच्याच्या जोडीला अटक