छत्रपती संभाजीनगर – राज्याच्या राजकीय क्षितिजावर आता एका नवीन पक्षाचा उदय होणार आहे, त्यामुळं स्वाभाविकपणे राज्याच्या राजकारणात एका नव्या पक्षाची एन्ट्री घेतली आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बीआरएसची (BRS) शक्ती प्रदर्शन करत मोठी जाहिर सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी केली असून, वाहतूकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर (Chattrapati Sambhaji nagar) शहरातील जबिंदा मैदानावर ही सभा होणार आहे. यामुळं सगळीकडे बीआरएसच्या झेंड्यानी गुलाबी वातावरण बनले आहे. तसेच के सी राव (K C Rao) यांच्या वेगवेगळ्या योजनांचे मोठमोठे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. तर सभेसाठी हजारो खुर्च्यांची मांडणी करण्यात आली आहे.
‘बीआरएस‘चा विस्तार वाढतोय…
यापूर्वी नांदेड जिल्ह्यात देखील बीसीआरच्या दोन सभा झाल्या आहेत. यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होत आहे. आगामी काळात मराठवाड्यासह महाराष्ट्रात ‘बीआरएस’चा विस्तार व ताकद वाढवण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. तसेच अन्य राजकीय पक्षातील अनेक नेत्यांनी याआधी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. यात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्याचा समावेश आहे. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली आजची सभा पार पडत आहे.
आगामी काळात निवडणूक लढवणार
दरम्यान, बीआरएस पक्षाचे प्रमुख के सी राव यांचे महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहेत, काही महिन्यापूर्वी राव यांनी मुंबईत येत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच केंद्रीय पातळीवर देखील आपला दबादबा निर्माण करण्यासाठी आणि भाजपाला विरोध करण्यासाठी के सी राव यांनी विरोधीपक्षांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न केले होते. भाजपाच्या विरोधात त्यांचा मोट बांधण्याचा प्रयत्न आहे, यामुळं राज्यातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. तर आजच्या सभेत देखील अनेक नेत बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळं महाराष्ट्रात आज सभेच्या माध्यमातून बीआरएस शक्तीप्रदर्शन करणार आहे.






