Photo credit- Social Media गुजरातमधुन इव्हीएम आले, मशीनमध्ये गडबड; रोहित पवारांचा आरोप
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयाबाबत शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणूक निकाल आश्चर्यकारक असल्याचे सांगितले. सर्व काही पक्षश्रेष्ठींच्या अपेक्षेच्या विरुद्ध आहे. ते म्हणाले की आम्ही किंवा सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार आमच्या उमेदवारांची विजयी संख्या 120-130 असणार होती, परंतु निकालात ही संख्या 40-50 वर आली हे आश्चर्यजनकच नाही तर धक्कादायकही आहे.
रोहित पवार म्हणाले, “आम्ही सध्या या विषयावर बोलत नाही कारण आमच्या पक्षाचे आणि संघटनाचे लोक याबाबत रणनीती तयार करत आहेत. पण महाराष्ट्राचे सर्व प्रकल्प गुजरातला देण्यात आले. पण गुजरातमधून महाराष्ट्राला ईव्हीएम मशीन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
RBI Governor Shaktikanta Das news: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास रुग्णालयात दाखल
आश्चर्यकारक बाब म्हणजे विरोधी पक्षाचे जे उमेदवार रिंगणात उभे होते. त्यांना त्याच्याच गावात आणि त्यांच्याच मतदारसंघात निगेटिव्ह मतदान झाले आहेत. कर्जत जामखेडमध्ये एका जागेवर दोन उमेदवारांना जवळपास सारखीच मते मिळणे आश्चर्यकारक आहे. मतदान केंद्रावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनीही संशयास्पद हालचाली आणि इव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचे सांगत होते, असा आरोप रोहित पवार यांनी यावेळी केला.
रोहित पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 2014 ची लोकसभा निवडणूक खोटे बोलून जिंकली तेव्हा देशभरात जल्लोष झाला होता. पण महाराष्ट्रात महायुतीचे 230 उमेदवार विजयी झाले आहेत, तरीही असा जल्लोष झालेला नाही. महायुतीच्या उमेदवार जिथून विजयी झाले त्या कार्यालयात फटाके फोडण्यात आले असले तरी
बाहेर जल्लोष दिसला नाही. वरून हे स्पष्ट होते की, निवडणुकीचे निकाल असले तरी ते जनतेच्या इच्छेनुसार लागलेले नाही, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.
#WATCH | Mumbai | On Assembly election results, NCP-SCP leader Rohit Pawar says, “Unfortunately, nothing happened as per the expectations of MVA leaders…There is discussion among the public that there are some discrepancies in EVMs… There is also a discussion among the public… pic.twitter.com/q5mDtEvkyo
— ANI (@ANI) November 25, 2024