कारंजा : एका अनोळखी वृद्धाची हत्या करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. ही घटना बुधवार ३० मार्च रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील हेटीकुंडी फाट्याजवळ उघडकीस आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. मृतकाची ओळख अद्याप पटली नसून मृतकाचे वय अंदाजे ६० वर्ष असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे.
[read_also content=”नागपूर सुधार प्रन्यासचा ९२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर https://www.navarashtra.com/maharashtra/nagpur-reforms-pranyas-budget-of-rs-927-crore-presented-nraa-262213.html”]
बुधवारी दुपारच्या सुमारास रस्त्याने जात असलेल्या नागिरकांना रोडच्या कडेला मृतदेह असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी कारंजा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक बबन मोहंदूळे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकासह फॉरेन्सिकच्या टीमलाही पाचारण केले. सदर म्रतदेहाची पोलिसाकडून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पुढील तपास पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बबन मोहंदूळे, पोलिस कर्मचारी किशोर कडू, गुड्डू थुल, किशोर कापडे, दीपक सोनवणे, तुषार चाफले आदी करीत आहेत.