वर्धा : खरीप हंगाम २०२० मध्ये सततच्या पावसामुळे व सोयाबीन पिकावरील खोडअळी (the worm) तसेच कापसावरील गुलाबी अळीमुळे (Pink bollworm on cotton) जिल्ह्यात २६२२५७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. अळी व पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी शेतक-यांना १७८ कोटी ३३ लाख ५० हजार ३२० रूपये भरपाई देण्यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षकांनी(District Agriculture Superintendent) जिल्हाधिका-यांमार्फत प्रस्ताव सादर केला होता. मात्र, मागील दोन वर्षांपासून सरकारने मदतीची रक्कम न दिल्यामुळे शेतक-यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. अशातच मागील १५ दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविल्याने शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. अशा विदारक परिस्थितीमध्ये शेतक-यांची नुकसानाची भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. पंकज भोयर (MLA Dr. Pankaj Bhoyer) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे केली.
विभागीय आयुक्त कार्यालयात (the office of the Divisional Commissioner) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी ही बाब निर्दशनास आणून देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. बैठकीला विभागीय आयुक्त पियुष सिंग (Divisional Commissioner Piyush Singh), जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार (Collector Prerna Deshbhartar), जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) डॉ. सचिन ओंबासे (Dr. Sachin Ombase) व अधिकारी उपस्थित होते.
खरीप हंगामातील ऑगस्ट २०२० मध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. यातून पीक सावरत नाही तर सोयाबीन पिकावर खोड अळीने आक्रमण केल्याने बहुसंख्य शेतक-यांनी पीक सुद्ध कापले नाही. तसेच, कापूस पिकावर गुलाबी बोंडअळी व इतर रोगांनी आक्रमण केल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. कृषी विभागाने (the Department of Agriculture) नुकसानीचा सर्व्हे करून जिल्हाधिका-यांमार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावात ११७०६८.८८ हेक्टर मधील सोयाबीन पिकाचे ७९ कोटी ६० लक्ष ७५ हजार १८४ रूपयांचे तर १४५१८७.५२ हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकाचे ९८ कोटी ७२ लक्ष ७५ हजार १३६ रूपयांचे नुकसान झाल्याचे शासनास कळविले होते. नुकसान भरपाईची रक्कम शेतक-यांना मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आमदारांनी पाठपुरावा केला होता. मात्र, अजूनपर्यंत निधी प्राप्त न झाल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
या वर्षीसुद्धा १७ व १८ जुलैला वर्धा जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक १६९ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहू लागले तसेच धरणातून पाण्याचा मोठया प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा जलमय झाला. अनेक शेतक-यांच्या शेतातील उभी पिके पुरामुळे खरडून गेली व काही शेतात पाणी साचल्याने पीके सडून गेली आहेत. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या कोपामुळे हवालदिल झाला आहे. अशातच सन २०२० मध्ये सोयाबीन व कापूस पिकाच्या झालेल्या नुकसानीची रक्कम प्राप्त न झाल्याने शेतक-यांच्या अडचणीत एकप्रकारे भरच पडली आहे. वर्तमान सरकार शेतकरी हिताचे सरकार म्हणून समजले जाते, त्यामुळे, आपण पुढाकर घेऊन १७८ कोटी ३३ लक्ष ५० हजार ३२० रूपये भरपाई देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी आमदार डाँ. भोयर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.