मुंबई : पुण्यात (Pune) बुधवारी रात्री माजी मंत्री व आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला. (MLA Uday Samant Attack) यानंतर हल्ला करणारे हे शिवसैनिक होते असा दावा उदय सामंत यांनी केल्यानंतर व तशी पोलिसात तक्रार (Police complaint) दाखल केल्यानंतर काही संशयित शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केले. तसेच काहींवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले. दरम्यान, तानाजी सांवत (Tanaji sawant) यांच्यावर हल्ला करायचा होता, पण उदय सामंत यांच्या गाडीवर सावंत समजून शिवसैनिकांनी हल्ला केला असं सुद्धा बोललं जात आहे. या घटनेनंतर अनेक शिवसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल (Shivsainik fir) केले आहेत. याविरोधात शिवसेना (Shivsena) सुद्धा आक्रमक झाली आहे.
[read_also content=”मोठी बातमी! संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-till-eight-august-ed-custody-court-hearing-today-311858.html”]
दरम्यान, शिवसैनिकांवर होत असलेले गुन्हे दाखल याबाबत शिवसेना शिष्टमंडळ पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. शिवसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्यांच शिवसेनेकडून म्हणण्यात आलं आहे. तसेच सर्व गुन्हे मागे घेण्याची शिवसेसेना शिष्टमंडळ मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालकांची भेट (Visit of Director General of Police) घेत गुन्हे मागे घेण्याची विनंती करणारे निवदेन दिले. यावेळी आमदार निलम गोर्हे, खासदार विनायक राऊत, मनिषा कायंदे तसेच आमदार सचिन आहिर व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.