Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप आत्मनिर्भर भारतातील महत्वाचा उपक्रम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तेलंगणामधील हैद्राबाद येथे ११ फेब्रुवारीला ही फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप कार रेस पार पाडणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या ई-व्हेईकल्स वर्ल्ड चॅम्पियनशिप या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, देशात होणाऱ्या पहिल्या अशा उपक्रमाची सुरवात मुंबईतून होत आहे, याचे समाधान आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 13, 2023 | 08:30 AM
फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप आत्मनिर्भर भारतातील महत्वाचा उपक्रम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : रस्ते हे विकासाचा मार्ग असतात असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknth shinde) यांनी फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप  (Formula-E World Championship) हा आत्मनिर्भर भारत उपक्रमातील महत्वाचा भाग ठरेल. म्हणूनच या स्पर्धा महाराष्ट्रातही व्हाव्यात, असे निमंत्रणही दिले. भारतात पहिल्यांदाच आयोजित केल्या जाणाऱ्या फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप या ई व्हेईकल्सच्या कार रेसमधील कारचे (Car Race of E Vehicles) मुख्यमंत्री शिंदे, केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, तसेच तेलंगणाचे नगर विकास मंत्री के. टी. रामा राव (Deepak Kesarkar, as well as Telangana Urban Development Minister K. T. Rama Rao) यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी गेटवे ऑफ इंडियांच्या प्रांगणात शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

[read_also content=”हुडहुडी! महाराष्ट्र गारठला… उत्तर भारतातून महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता, तर ‘या’ भागात पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज; ही आहेत कारणे? https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-gets-cold-cold-wave-likely-to-hit-maharashtra-from-north-india-meteorological-department-predicts-rain-in-this-area-are-these-the-reasons-361296.html”]

या कार अनावरण सोहळ्यास तेलंगणाच्या नगर विकास विभागाचे सचिव अरविंद कूमार, तसेच ग्रीनको समुहाचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चलमाशेट्टी आदी उपस्थित होते. तेलंगणामधील हैद्राबाद येथे ११ फेब्रुवारीला ही फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप कार रेस पार पाडणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या ई-व्हेईकल्स वर्ल्ड चॅम्पियनशिप या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, देशात होणाऱ्या पहिल्या अशा उपक्रमाची सुरवात मुंबईतून होत आहे, याचे समाधान आहे. मुंबई ही देशाची शान आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात हा सोहळा होतो आहे, यालाही वेगळे स्थान आहे. नुकताच जी-२० ची आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची बैठक इथे झाले. त्यांना परिसर खूप आवडला होता. अशी ही फार्म्युला- रेस महाराष्ट्रातही व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी इथे रस्त्यांचे उत्तम जाळे आहे. नुकतेच आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खुला केला आहे. हा महामार्ग या रेससाठी उत्तम ठरेल. त्यामुळे यात सहभागी होणारेही खुश होतील, असे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धा आयोजकांना आपल्या भाषणात दिले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भुपृष्ठ वाहतूक मंत्री गडकरी यांच्या रस्ते विकास आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील कामांची प्रशंसाही केली. त्यांच्यामुळेच मुंबईत ५५ उड्डाण पुल उभे राहील्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य आहे. इथे उद्योगांसाठी पोषक अनेक घटक उपलब्ध आहेत. मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि एक खिडकी योजना सारख्या सवलती आहेत. महाराष्ट्रात अनेक रस्ते प्रकल्पांचे काम सुरु आहे. आम्ही वेगाने या महाराष्ट्राने प्रगतीपथावर नेत आहोत. यात केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांसह केंद्रीतल अनेक मंत्र्यांचे सहकार्य मिळत आहे. या सहकार्यातूनच आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचे आहे. फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्व असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, आपल्याला ई-व्हेईकल्सच्या वापराव भर द्यायचा आहे. त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करायची आहे. याशिवाय इथेनॉलसारख्या ग्रीन फ्युईलच्या वापरालाही प्रोत्साहन द्यायचे आहे. यातून आपल्या इंधनाची आयात कमी करायची आहे. पुढे जाऊन फाईव्ह ट्रीलीयन ईकाँनामीचे उद्दीष्टही गाठायचे आहे. यात आपली अँटोमोबाईल इंडस्ट्रीजचा सर्वात मोठा वाटा असेल. कारण आज हेच क्षेत्र सर्वाधिक जीएसटी भरते. हेच क्षेत्र सर्वाधिक रोजगार निर्मिती करते. आपल्याला अधिकाधिक ई-व्हेईकल्स, कार-ट्रक्सची निर्मिती करायची आहे. आपल्याकडे सौर ऊर्जा मुबलक आहे. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही याच साऱ्या गोष्टींवर भर असतो. म्हणूनच येत्या काळात आपल्याला ई-व्हेईकल्सचा वापर आणि त्यांच्या निर्मितीवर भर द्यायचा आहे. आपल्या आत्मनिर्भर भारताच्या उद्दीष्टापैकी एक असे हे उद्दीष्ट आहे. त्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून आपण ही स्पर्धा आयोजित करत आहोत. सुरवातीला या फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पिनयनशिप विषयीही माहिती सादर करण्यात आली.

Web Title: Formula e world championship is an important initiative of self reliant india chief minister eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2023 | 08:30 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Ashish Shelar
  • bachu kadu
  • Bhagat Singh Koshyari
  • Cm Eknath Shinde
  • DCM Devendra Fadanvis
  • Hasan Mushrif
  • jayant patil
  • Prakash Ambedkar
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘चांगले काम करणाऱ्यांच्या शासन कायम पाठिशी, इच्छाशक्ती असेल तर बदल…’; अजित पवार यांचं मोठं विधान
1

‘चांगले काम करणाऱ्यांच्या शासन कायम पाठिशी, इच्छाशक्ती असेल तर बदल…’; अजित पवार यांचं मोठं विधान

“फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये…; उपराष्ट्रपती पदासाठी फोन केल्यामुळे खासदार राऊतांचे टीकास्त्र
2

“फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये…; उपराष्ट्रपती पदासाठी फोन केल्यामुळे खासदार राऊतांचे टीकास्त्र

उपमुख्यमंत्र्याच्या पार्टीच्या कार्यकर्त्याने भर गर्दीत म्हणले, ‘I Love You Dada’, अजित पवारांनी दिले असे उत्तर की….Video Viral
3

उपमुख्यमंत्र्याच्या पार्टीच्या कार्यकर्त्याने भर गर्दीत म्हणले, ‘I Love You Dada’, अजित पवारांनी दिले असे उत्तर की….Video Viral

योग्य वेळ आली की आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफी करु….; अर्थमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास
4

योग्य वेळ आली की आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफी करु….; अर्थमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.